चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव सह कॉग्रेस व शिवसेना नेत्यांना चांदवड पोलीस स्टेशनमध्ये स्थानबध्द !
चांदवड चांदवड बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव व कॉँग्रेस कार्यकर्ते व शेतक -यांनी दोन दिवसापुर्वी चांदवडचे प्रांताधिकारी पुलकीतसिंग यांना कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत व द्राक्षाची कस्टम ड्युटी रद्द करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ द्या अन्यथा काळे झेंडे दाखविण्याची परवानगी द्यावी असे निवेदन दिले होते. मात्र शासनाकडून याबाबतची कोणतीही परवानगी न मिळाल्याने सभापती संजय जाधव यांचेसह सर्व कार्यकर्ते चांदवड बाजार समितीत सकाळी 9.00 वा. जमा झाले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी सर्व शेतकरी आग्रही असल्याने शासनाने जरी परवानगी दिलेली नसली, तरीही आपण ओझर येथे जावून नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेवू व त्यांना शेतक-यांच्या व्यथा सांगू, अशी भुमिका घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी चांदवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व उपनिरीक्षक सुरेश चौधरी व पोलीस कर्मचारी यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार,राहुल शिरीषकुमार कोतवाल,बाळासाहेब शिंदे,नंदु रघुनाथ कोतवाल, नंदकुमार भागवत कोतवाल,दिपांशु जाधव,बापू शिंदे,आदेश शेळके, शिवाजी कासव, भिमराव जेजुरे, रोहीत खांगळ, पप्पु शिंदे, संगम भामरे, दत्तु कोतवाल, धोंडीराम पिंपरकर, कैलास सावकार, वैभव जाधव, अक्षय जाधव, शिवसेना उध्दव बाळासाहेब शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, प्रसाद प्रजापत यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले,
राज्य शासनाकडे वेळोवेळी दाद मागुनही राज्य शासन शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावत नाही, त्यामुळे देशाचे पंतप्रधानांची भेट घेवू व त्यांना शेतक-यांच्या व्यथा सांगु या भावनेने सर्व शेतकरी एकवटलेले होते, परंतु त्यांना पोलीसांनी स्थानबद्ध केल्याने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम मोदी सरकार भाजपा सरकार करीत आहे, तसेच या शासनाला शेतकरी महत्वाचा नसुन फक्त जाहीरातबाजी करणे, देखावा करणे व जनतेला भुलथापा देणे, तसेच शेतक-यांचा आवाज दाबून हुकुमशाही गाजविणे हेच ध्येय आहे, त्यामुळे
भाजपा सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा चांदवड तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांनी व्यक्त केले.

