दुगाव गटातील डोणगाव ग्रामपंचायत मिळाला वैकुंठ रथ: पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जिल्हा परिषद नाशिक
जि.प. सेस.सन.२०२३/२४ अंतर्गत वैकुंठ रथ ट्राॅली चांदवड तालुक्यातील
दुगाव जिल्हा परिषद गटातील
डोणगाव ग्रामपंचायतीची निवड झाली असून सदर डोणगाव ग्रामपंचायतीस मिळालेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले आहे. डोंनगाव सारख्या गावात सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर लोकार्पण सोहळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते नाशिक येथील डोंगरे वस्तीगृह येथे संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ, प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे , चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिन्द्र साबळे,
विस्तार अधिकारी सुनील पाटिल किशोर लोहार, श्री राठोड आदी उपस्थित होते. डोणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गोकुळ वाघ , संदिप जेजूरे, रमेश सोमासे,ग्रामसेवक विशाल सोनवणे आदींनी वैकुंठ रथ स्वीकारला. सदर वैकुंठ रथ गावात मिळाल्याने गावातील अंत्यविधीसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सदर वैकुंठ रथ आपण आजूबाजूच्या परिसरातील गावांना सुद्धा उपलब्ध करून देऊ असे सरपंच गोकुळ वाघ यांनी सांगितले आहे.

