मनमाडला रक्तदान करण्यास रक्तदात्यांचा प्रचंड विक्रमी प्रतिसाद
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिर रक्तदान करण्यास रक्तदात्यांचा प्रचंड विक्रमी प्रतिसाद मिळाला

रक्तदान हनुमान नगर सत्संग सभा मंडपात ठेवण्यात आले होते या याप्रसंगी 261 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदाते रक्तदान करण्यास गर्दी करून उभे होते पण 261 पिशव्या उपलब्ध असल्याने पिशव्या अभावी अनेक रक्तदात्यांना रक्तदान करण्यापासून वंचित रहावे लागले रक्तदात्यांना चहा, बिस्कीट नाश्ता , पाण्याची तसेच प्रत्येक रक्तदात्याला एक टिफिन व प्रमाणपत्र देण्यात आले


