चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक संपन्न…
चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्राम गृह येथे पार पडली, बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अनिल काळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी आज झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
१) चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष पदी नितीन गांगुर्डे
२) विधानसभा कार्याध्यक्ष पदी सुजित बाराहाते
३) चांदवड तालुका अध्यक्ष पदी दशरथ ठाकरे
४) चांदवड तालुका कार्याध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पगार
५) चांदवड शहराध्यक्ष पदी आसिफ खान

नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक ताकदीने चांदवड तालुक्यातील संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुरेश गांगुर्डे, मनमाड शहराध्यक्ष जावेद शेख यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.

