[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयात नॅक कमिटीची परीक्षण भेट

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

यावल महाविद्यालयात नॅक कमिटीची परीक्षण भेट

यावल (प्रतिनिधी)
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅक पुनर्मूल्यांकन होत असून पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयात नॅक कमिटीचे आगमन झाले. यात डॉ. पी.के. विजयन (कन्नूर विद्यापीठ, केरळ) प्रा. राधेश्याम रॉय (बनारस हिंदू विद्यापीठ, उत्तर प्रदेश) व प्राचार्य राज किशोर भंडारी (बी.डी. इन्स्टिट्यूट ऑफ,दिल्ली) प्रमुख अतिथींचे प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सकाळच्या पहिल्या सत्रात प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी महाविद्यालयीन कामकाजाबद्दल सादरीकरण करून सविस्तर आढावा मांडला. समितीने संस्थेचे व्यवस्थापन मंडळ चेअरमन दादासाहेब वीरेंद्रजी भोईटे यांच्याशी संवाद साधला. तसेच इंग्रजी, रसायनशास्त्र, हिंदी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र,संगणक शास्त्र, वाणिज्य आदी विषयांचे संबंधित प्राध्यापकांनी संगणीकृत पी.पी.टी. स्लाईडवर सादरीकरण केले. आय. क्यू. एस. सी. कार्यालय, भाषा प्रयोगशाळा, संगणक खोली, शिक्षक दालन, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, ग्राहक भांडार, मुलींची बैठक रूम, परीक्षा पद्धत, आदिवासी म्युझियम, पटांगण, बॉटनिकल गार्डन इत्यादींची काटेकोर पाहणी करून परीक्षण केले. दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाची तपासणी करण्यात आली.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात आदिवासी नृत्य, लोक नृत्य, महाराष्ट्र गीत, भरतनाट्यम व केमिकल शेती जनजागृतीपर सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली.
यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. सुधीर कापडे, प्रा. एस. आर. गायकवाड,डॉ.हेमंत येवले, ( नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव) श्री. किरण देशमुख, श्री. अनिल इंगळे श्री सुधीर निकम, प्रा. मुकेश येवले उपस्थित होते. नॅक समितीने माजी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. प्रा. राधेश्याम रॉय यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रशंसा करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. गुणवत्ता संपन्न प्रभावी क्षमता असलेले विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. जीवनात संघर्ष करून घवघवीत यश संपादन केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अफाक अंजुम शेख यांनी केले तर आभार प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या