[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

एनडीएसटी तर्फे कन्यादान योजनेचा चेक श्री गांगुर्डे यांना सुपूर्द

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

 

एनडीएसटी तर्फे कन्यादान योजनेचा चेक श्री गांगुर्डे यांना सुपूर्द

सोग्रस येथील श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस या शाळेतील लिपिक श्री माणिक तुकाराम गांगुर्डे सर यांच्या मुलीच्या विवाह निमित्ताने एन. डी. एस .टी.सेवक सोसायटी नाशिक तर्फे दिला जाणारा कन्यादान योजनेचा चेक सोसायटीचे मा. व्हा.चेअरमन व विद्यमान संचालक श्री ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या हस्ते श्री माणिक गांगुर्डे व त्यांच्या पत्नी सौ नंदा गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला.
एन. डी. एस. टी. सेवक सोसायटी नाशिक तर्फे सभासदांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. सभासदांच्या मुलीच्या बापाचा व आईचा कन्यादानाचा आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी या सकारात्मक उद्देशाने सोसायटीतर्फे अकरा हजार रुपयांचा चेक सभासदांच्या कन्या पाल्यांना देण्यात येतो. या स्तुत्य उपक्रमाबद्दल विवाहात उपस्थितांनी सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक करत गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी सोसायटीचे मा. व्हा.चेअरमन विद्यमान संचालक श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर, वरपिता श्री शांताराम नामदेव वाघ, श्री हनुमान शै.सा. सां. संस्था सोग्रसचे सचिव श्री प्रशांतदादा भास्करराव बनकर, श्री अ.प. माध्यमिक विद्यालय सोग्रसचे मुख्याध्यापक रावसाहेब जाधव सर सौ. प्रियाभारती जाधव, श्री भगवंत बोरगुडे, श्री कडू थोरमिसे, श्री सुभाष गांगुर्डे, श्री कौतिक शिंदे, श्री विजय देवरे, श्री छबू गांगुर्डे, वधू वरांकडील नातेवाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या