[masterslider id="2"]
मुख्य बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चांदवड तालुका वतीने पारेगाव येथे. सर्व रोगनिदान शिबीर संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चांदवड तालुका वतीने पारेगाव येथे. सर्व रोगनिदान शिबीर संपन्न.

पारेगाव./दि.१६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चांदवड तालुका व म. वि. प्र. समाजाचे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे, संकल्पनेतुन जनता विद्यालय पारेगाव येथे सर्व रोगनिदान शिबीर पार पडले. शिबिराचे पथक प्रमुख व मेडिकल कॉलेज चे डिन डॉ. सुधीर भांबरे व सर्व तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. उत्तम बाबा भालेराव होते. तर शिबीराचे उदघाटन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भास्कर भगरे सर यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कादवा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. श्रीराम शेटे व दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय पाटील उपस्थित होते.
जास्तीत जास्त रुग्नांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.” रुग्णाची सेवा हीच खरी सेवा”. असे उदगार आपल्या प्रास्ताविकेत डॉ सयाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.तर खासदार भगरे सर यानी म. वि. प्र संस्थेची कृतज्ञता व्यक्ती केली. तर श्रीराम शेटे व मा. आ. उत्तमबाबा भालेराव यांनी डॉ.सयाजीराव गायकवाड व पारेगाव ग्रामस्थांचे शिबीर आयोजन बद्दल आभार व्यक्त केले.शिबीरात विविधविविध विषयातील तज्ञ डॉक्टर, लॅब टेक्निशियन, व इतर स्टाफ यांनी सेवा दिली, तर अनेक रुग्नानी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. श्री अरुण न्याहरकर,श्री शहाजी भोकनळ, श्री दत्तात्रेय वाघचौरे, श्री शिवाजीराव रस्ते उपाध्यक्ष कादवा कारखाना. पारेगाव सरपंच. श्रीमती. संगिताताई पवार, शालेय समिती अध्यक्ष.श्री रमाकांत शिंदे, श्री म्हसु गागरे., कादवा संचालक श्री सुखदेव जाधव, श्री रामकृष्ण तिडके, श्री रावसाहेब भालेराव सरपंच वडनेर ग्रामपालीका, डॉ. विक्रम सलादे,श्री मधुकर टोपे सर,मा.सभापती श्री अमोल भालेराव.श्री सुदाम लांडगे. श्री विजयराव जाधव, श्री खंडेराव आहेर. श्री निलेश आहेर सरपंच पिंपळनारे,शैलेश ठाकरे, विक्रम जगताप, विलास माळी, अनिल पाटील, अभिजित ठाकरे, तसेच पारेगाव परीसरातील अनेक रुग्नानी आपली तपासणी करुन घेतली. व पुढील उपचारासाठी रुग्नाना मेडिकल कॉलेज नाशिक येथे पाठविण्यात आले.शिबीर यशस्वीतेसाठी जनता विद्यालय पारेगाव चे मुख्याध्यापक श्री शिदे सर व सर्व शालेय परिवार यांनी प्रयत्न केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या