मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यातील अठ्ठावीस हजार महिलांनी अर्ज दाखल करून जिल्हात आघाडी :- आ.डॉ.राहुल आहेर.
मेसनखेडे खेडे गणातील दरेगाव येथे उत्साहात शुभारंभ…

चांदवड तालुक्यातील एकूण २८००० महिलांनी आपले ऑनलाईन अर्ज भरले आहे ,ही संख्या नाशिक जिल्यात सर्वात जास्त असून ही योजना संबंधित विभागाने मनापासून काम केल्यामुळे प्रत्येक गरजू महिलेला योजनेचा फायदा होणार असून संबंधित विभागाचे तसेच आशा सेविकांचे कौतुक यावेळी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी केले.राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा चांदवड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राधाकृष्ण लॉन्स, दरेगाव ता.चांदवड येथे शनिवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.राहुल आहेर यांनी आपल्या भाषणात योजनेविषयी सांगितले.मोठ्या उत्साहात शुभारंभाचा हा कार्यक्रम पार पडला. या शुभारंभ कार्यक्रमासाठी मेसनखेडे गणातील हजारो माता-भगिनी उपस्थित होत्या. या सर्व माता व भगिनींना जागेवरच या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी चांदवड तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे तहसील व पंचायत समिती कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले. अनेक आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माता-भगिनींना आवश्यक सरकारी कागदपत्रे देणे व त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम केले. त्यामुळे मेसनखेडे गणातील माता-भगिनींना खूप मोठी मदत झाली. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी चांदवड तालुक्याच्या वतीने मी आभार मानले. याशिवाय चांदवड- देवळा मतदार संघात महिल्याभरात गण निहाय अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त आपल्या चांदवड तालुक्यातील महिलांचे योजनेचं अर्ज ऑनलाईन झाले आहे. तसेच उर्वरित महिलांचे ही अर्ज लवकरात लवकर योजनेचे अर्ज भरून द्यावेत असे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

शासनाची योजना ही कल्याणकारी योजना आहे. त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी असणार असल्याने कोणीही काळजी करू नये व विरोधकांच्या भूल थापांना बळी न पडता योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन डॉ. आहेर यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उत्कृष्ट कामकरणाऱ्या अश्या सेविका श्रीमती. मनीषा अर्जुन गांगुर्डे व श्रीमती.शारदा रामचंद्र पाटील यांचा आमदार डॉ.राहुल दादा आहे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.नितीन गांगुर्डे, नायब तहसीलदार श्री.कचवे, श्री.बाळासाहेब माळी, श्री.पंढरीनाथ खताळ, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, श्री.शांताराम भवर, श्री.भावराव देवरे, माजी सरपंच नथू देवरे, निमोण सरपंच डॉ. स्वाती देवरे, .पिंटू भोयटे, श्री.अमोल देवरे, संजय गांगुर्डे, भाऊसाहेब देवरे, बबन गांगुर्डे, माहरू गांगुर्डे, एन. डी.देवरे,.वाल्मिक पवार, केशव खैरे, .समाधान कलवर, .अंबादास ठोंबरे, किरण बोरसे, .आत्माराम खताळ,रोहित आहिरे, संतोष नागरे, मुकेश आहेर, , अमोल जाधव, पिंटू भोयटे, .अमर मापारी, राहुल हंडगे, .गणेश ठाकरे, किशोर पवार तसेच आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, आधार केंद्र विभाग, पंचायत समिती अधिकार व कर्मचारी व मेसनखेडे गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

