*शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी चांदवडला काँग्रेसचे धरणे आंदोलन*

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणी इतर मागण्यांसाठी चांदवड येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशात कोणीही उपाशी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळी वारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबुन आहे. शेतक-यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल. शेतकरी जगेल तरच जग जगेल. शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. जिल्हा टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर असतांना देखील बॅंका पतसंस्थांकडुन शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसुली होत आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. बेकायदेशिर कर्जवसुली तात्काळ थांबविणे गरजे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला अपेक्षित यश न मिळाल्याने राज्य शासन लाडकी बहिण व लाडका भाऊ यासारख्या फसव्या योजना काढत आहे. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येणार या जुमलेबाज आश्वासनांपासुन सुरु झालेला प्रवास आज 1500/- पर्यंत येऊन ठेपला आहे, तसेच मोदी सरकाच्या काळात 22 उद्योजकांची 16 लाख कोटी रुपयांची कर्ज माफी झालेली आहे. केंद्रामध्ये मागील 10 वर्षापासुन व राज्यात देखील महायुतीचे सरकार आहे. मात्र शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. जो जगाचा पोशिंदा आहे, तो आज कर्जबाजारी झालेला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरुन शेतक-यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही, तर शेतक-यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही. हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असुन या सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी याकरीता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याप्रमाणे आज शुक्रवार दि.26/07/2024 रोजी .चांदवड तहसिल कार्यालयावर शेतक-यांच्या संपुर्ण कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात शेतक-यांना संपुर्ण कर्ज माफी मिळावी. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याचा आधार घेऊन महायुतीच्या सरकारने देखील नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र अद्याप पर्यंत शेतक-यांना त्याचा फायदा झाला नाही. तरी सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. त्याचप्रमाणे पिक कर्ज देतांना स्टेट बॅंक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ महाराष्ट्र या सारख्या बॅंका शेतक-यांची तोंड पाहुन पिक कर्ज वाटप करत आहेत, तरी कोणतेही अटी व शर्ती न लावता सरसकट पिक कर्ज वाटप करावे.
तरी वरीलप्रमाणे मागण्यांचा विचार करुन शेतक-यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन चांदवडची तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.शिरिषकुमार वसंतराव कोतवाल , तालुकाध्यक्ष श्री.संजय दगुजी जाधव , कार्याध्यक्ष श्री.समाधान कारभारी जामदार , श्री.शिवाजी बाबुराव कासव , श्री. नंदु (आबा) कोतवाल,
,श्री.राहुल शिरिषकुमार कोतवाल , श्री. भिमराव जेजुरे , श्री. उत्तमराव ठोंबरे .
श्री.दिपांशु जाधव , श्री. दत्तु मामा ठाकरे,, संजय कोल्हे, , कैलास कोतवाल आनंदा बनकर, बाळासाहेब गांगुर्डे, राजेंद्र साठे बाबाजी ठाकरे अल्ताफ तांबोळी गंगाधर कोतवाल अनिल कोतवाल बाळासाहेब कोतवाल अशोक जाधव अकील शेख, अस्लम पटेल, बाळासाहेब पवार, विश्वनाथ ठोके बापू शिंदे, बापू जाधव पोपट जाधव शिवाजी जाधव सोपान जाधव हरिभाऊ काळे यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते.

