[masterslider id="2"]
मुख्य बातमी

चांदवड बाजार समितीचे उपबाजार आवार, वडाळीभोई येथे नियमित टोमॅटो लिलाव सुरु : सभापती संजय जाधव

चांदवड बाजार समितीचे उपबाजार आवार, वडाळीभोई येथे नियमित टोमॅटो लिलाव सुरु : सभापती संजय जाधव

चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार, वडाळीभोई ता.चांदवड येथे गुरुवार दि.15/08/2024 रोजी दुपारी 4.00 वा. टोमॅटो व भाजीपाला या शेतीमालाचे लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव व शेतकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

दरम्यान पहिल्याच दिवशी टोमॅटोची 1000 कॅरेट आवक होवून 500 ते 561 बाजारभाव मिळाले. तसेच काकडी 200 ते 300 प्रति, दोडके 500 ते 555 प्रति क्रेटस, गिलके 300 ते 401 प्रति क्रेटस, वाल 40 ते 45 प्रति किलो, घेवडा 40 ते 42 प्रति किलो, पिकाडोर मिरची 25 ते 28 प्रति किलो, कोबी 12 ते 15 प्रति किलो, मेथी 600 ते 700 शेकडा, याप्रमाणे बाजारभाव मिळाले आहे. भाजीपाला शेतीमालाची एकुण 1000 कॅरेटची आवक झाली.

वडाळीभोई हे गाव मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन या गावाची ओळख आहे. प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये वडाळीभोई व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो व भाजीपाला शेतीमालाचे उत्पादन घेतले जाते. वडाळीभोई व परिसरातील शेतक-यांनी व व्यापारी वर्गाने वडाळीभोई येथे टोमॅटो व भाजीपाला लिलाव सुरु करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे 15 ऑगष्ट 2024 रोजी यश पेट्रोलपंपजवळ, मुंबई-आग्रा हायवे, वडाळीभोई येथे टोमॅटो व भाजीपालाचे लिलाव सुरु करण्यात आले आहे. लिलाव शुभारंप्रभप्रसंगी बाजार समितीचे सभापती संजय जाधव, उपसभापती कारभारी आहेर संचालक सर्वश्री सुखदेव जाधव, राजेंद्र दवंडे, बापु शिरसाठ, टोमॅटो /भाजीपाला खरेदीदार (सर्वश्री) नारायण शिंदे, नितीन शिंदे, तान्हाजी मेहंदळे, सागर साबळे, महेंद्र रकिबे, जितेंद्र जैन, रुपेश मिसर, विशाल खांदे, गणेश घुगे व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थि होते.

शेतीमाल विक्रीचे पेमेंट रोख स्वरुपात दिले जाणार असल्याने शेतक-यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन आणावा, तसेच शेतमाल विक्रीची रक्कम माल विक्रीच्या दिवशीच घ्यावी. असे आवाहन समितीचे सभापती संजय जाधव, उपसभापती श्री. कारभारी आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या