[masterslider id="2"]
मुख्य बातमी

दरेगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दरेगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विकास माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे गावातून प्रभात फेरी काढली. यावेळी दरेगाव ग्रामपंचायतचे ध्वजपूजन एन.डी.देवरे तर ध्वजारोहण गावातील माजी सैनिक हरीभाऊ देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजपूजन दामू देवरे, ध्वजारोहण चेअरमन विक्रम गांगुर्डे यांनी केले.स्कूल कमिटी चे अध्यक्ष संजय अहिरे यांच्या हस्ते तर आयुर्वेदिक दवाखान्याचे ध्वजारोहण माजी सैनिक रमण गांगुर्डे यांनी केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्य कार्यक्रम झाला .यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजपूजन मुंबई पोलीस दलातील विकास देवरे व स्कूल कमिटी अध्यक्ष नूतन पगार यांच्या हस्ते संयुक्तरीत्या झाले तर ध्वजारोहण शालेय समिती सदस्य व माजी सोसायटी चेअरमन विक्रम देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी, राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत म्हणण्यात आले.


तसेच याप्रसंगी अनिल गव्हाणे यांनी आपल्या मातोश्री सरुबाई गव्हाणे यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रथम येणाऱ्या एक ते तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 501 रु ,301रू व 201 रु रोख बक्षीस वाटप केले.

तसेच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले व दरेगावचे विकास हरिभाऊ देवरे यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चार वाह्यांचा संच वाटप केला. तसेच दरेगाव शालेय व्यवस्थापन सदस्य विक्रम कारभारी देवरे यांनी शाळेसाठी डिजिटल वजनकटा, फुटबॉल व बॅट इ. क्रीडा साहित्य मुलासाठी दिले.

त्याचप्रमाणे गावातील सर्व जेष्ठ व्यक्तींनी एकत्र येऊन शाळेसाठी अहुजा कंपनीचे एम्प्लिफायर, दोन मोठे स्पीकर बॉक्स असा एकूण 30,000 रुपये किंमतीचा साउंडसिस्टीम संच द्यायचे ठरवले त्याप्रमाणे रक्कमही जमवायला सुरुवात केली . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक साहेबराव देवरे यांनी केले तर सूत्रसंचालन दिपक निकम यांनी केले. मृदुंग वाजन सावंत सर यांनी केले. कार्यक्रमास सरपंच सरला पवार, सोसायटीचे चेअरमन विक्रम गांगुर्डे, उपसरपंच सोमनाथ देवरे, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव ,निवृत्ती अहिरे, अरुण गांगुर्डे, योगिता गांगुर्डे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बाबाजी देवरे, सोसायटीचे संचालक भाऊसाहेब देवरे भाऊसाहेब गांगुर्डे ,संजय गांगुर्डे , भाऊसाहेब जाधव,नथू देवरे, पुंजाराम गांगुर्डे , दगु पाटील देवरे, एन. डी.देवरे, विजय जाधव, रमेश देवरे,कौतिक जाधव, ऍड. समाधान गव्हाणे, योगेश पगार, समाधान गांगुर्डे,पोलिस पाटील सोमनाथ गांगुर्डे,सोमनाथ देवरे, रामदास पगार, भिला पगार, भाऊसाहेब अहिरे,सूर्यकांत गरुड, म्हसु पगार, नाना देवरे , दामू देवरे, दत्तु पगार, तुकाराम देवरे, मनोज देवरे, धनंजय देवरे,विनोद गांगुर्डे, वाल्मीक आहेर, तलाठी पिसोळकर , डॉ.श्रीमती राजपूत, ग्रामपंचायत सोसायटी कर्मचारी, प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी अशा सेविका यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या