निमोण येथे नवंक्रांती गणेश मंडळात केदानाना आहेर यांच्या हस्ते महा आरती.

रविवारी निमोन गावामध्ये नवक्रांती गणेश मिञ मंडळातर्फे आयोजित गणेश उत्सव सोहळा 2024 (वर्ष १४ वे)चे दुसऱ्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भारतीय जनता पक्ष नाशिक ग्रामीणचे मा .जिल्हाध्यक्ष तसेच नाफेडचे संचालक केदानाना आहेर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली . याप्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाची सुरुवात केदानाना आहेर यांच्या भव्य स्वागत सोहळ्यानी झाली. मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन जनार्दन देवरे यांनी केदा नाना आहेर यांचा सत्कार केला .तसेच मंडळातील अन्य सदस्य यांनी देखील केदां नानांचा सत्कार केला . समाजकारणात आपला ठसा उमटवणारे केदा नाना आहेर यांच्या प्रति तरुणांचे प्रेम याप्रसंगी दिसून आले. तसेच चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात भावी वाटचालीस युवकांनी घोषणा देखील याप्रसंगी दिल्या. चांदवड देवळा विधान सभेसाठी .केदा नाना आहेर हे एक आशेचा किरण आहे .अशी इच्छा देखिल तरुणांनी याप्रसंगी मनोगतातून व्यक्त केली. तसेच केदा नानांना तरुणांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यक्रमाची सांगता जागरण गोंधळातील गीताने झाली.

