चांदवड बाजार समितीच्या इतिहासात पहिली महिला डॉ.वैशाली शामराव जाधव यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड


चांदवड बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला उपसभापती विराजमान झालेल्या असुन बाजार समिती पदाधिकारी यांनी महिलांचा गौरव केला आहे. बिनविरोध निवड झाल्याने समर्थकांनी गुलालची उधळण आणि आतषबाजी करुन एकच जल्लोष केला.
चांदवड बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीकरीता श्रीमती सविता शेळके, प्राधिकृत अधिकारी, तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.11/09/2024 रोजी सकाळी 11.30 वाजता बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी उपसभापती पदासाठी विहीत वेळेत सौ.वैशाली शामराव जाधव यांचे एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झालेनंतर निवडणुक कार्यक्रमानुसार छाननीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार छाननी अंती सौ.वैशाली जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. उपसभापती पदाकरीता विहीत वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्रीमती शेळके यांनी सौ.वैशाली शामराव जाधव यांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती श्री.संजय जाधव, मा.आ.श्री.शिरिषकुमार कोतवाल व संचालक सर्व श्री नितीन आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, डॉ.सयाजीराव गायकवाड, कारभारी आहेर, राजेंद्र दवंडे, सुखदेव जाधव, योगेश ढोमसे,पंढरीनाथ खताळ, विक्रम मार्कंड, वाल्मिक वानखेडे, गणेश निंबाळकर, सचिन अग्रवाल, सुशिल पलोड, रविंद्र पवार, सौ.मिना शिरसाठ, सचिव-गोरक्षनाथ गांगुर्डे, निवडणुक सहाय्यक नितीन पाटील, किशोर भालेराव आदी.उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती यांचा संपुर्ण संचालक मंडळाने सत्कार करण्यात आला आहे. सत्काराप्रसंगी डॉ.शामराव जाधव, बापु शिरसाठ, समाधान जामदार, अनिल पाटील, विलास भवर इ. उपस्थित होते.

