तळेगाव येथील शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्ही मत खाणार नसून निवडून येणार असे ठाम मत..
प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर…

प्रहार कडून अधिकृत उमेदवारी जाहीर होताच उमराण्याला बच्चुकडू यांच्या उपस्थितीत हजारोच्या संख्येने शेतकरी मेळावा संपन्न झाल्यानंतर त्याच पाठोपाठ काल चांदवड तालुक्यातील तळेगाव गटातील कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव तळेगाव गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी निबाळकरांचे तळेगावकरांनी मोठ्या जल्लोष्यात फटाके वाजवत ऑक्षण करत स्वागत करून नवीन ट्रॅक्टर चे देखील पूजा करत एक शेतकरी नेत्याचं स्वागत करून मेळाव्याचे आयोजन केले प्रसंगी शेकडो शेतकरी, आणी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचेआयोजक बापूसाहेब भोकनळ, दादा बाबा वाकचौरे, शरदभाऊ भोकनळ,सुभाष ठाकरे, कचरू मोरे, हे होते, तसेच सूत्रसंचालन शरदजी गाढे यांनी करत श्री हरिभाऊ महाजन, समाधान बागल, चंद्रकांत जाधव, संदीप महाराज जाधव, योगेश भाऊ गाढे यांचे मनोगत यावेळी झाले..प्रसंगी प्रहार चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, गणेश पाचोरकर चंद्रकांत जाधव,व अनेक पदाधिकारीही उपस्थित होते त्यानंतर निंबाळकरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपली ध्येय धोरणे मांडली विरोधक काहीपण चर्चा करुदे मी कुणाची अडचण नाही ना कुणावर टिका करण्यासाठी नाही माझे काम जसे चालू आहे अहोरात्र तसेच सुरु असेल आणी प्रहारला शेतकऱ्यांची गोरगरीबाची साथ आहे निराधारांची वंचितांची साथ आहे आणी मी दिलेला शब्द वायाजावू देत नसतो प्रहार मत खाणार नसून निवडूनच येणार असल्याचे ठणकाऊन सांगितले…

