चांदवड येथे नविन लाल कांद्याचे खरेदीस प्रारंभ : सभापती संजय जाधव
चांदवड बाजार समितीचे आवारावर दैनंदिन कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु असुन समितीचे आवारावर माहे ऑक्टोंबर महिन्यापासुन नविन लाल कांद्याची आवक येण्यास सुरुवात होते. याच पार्श्वभुमीवर चांदवड येथे श्री.छोटु कारभारी सुर्यवंशी रा.दहिवड ता.देवळा यांनी शनिवार दि.05/10/2024 रोजी आपला नविन लाल कांदा विक्रीस आणला. यावेळी सभापती श्री.संजय जाधव, संचालक श्री. सचिन अग्रवाल, सुशिल पलोड, प्रविण हेडा व कांदा व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत नविन लाल कांद्याचे वाहनाचे पुजन व शेतकरी यांचा सत्कार करुन नविन लाल कांद्याच्या खरेदीस सुरुवात करण्यात आली. चांदवड बाजार समितीत व्यापारी वर्गाची संख्या व स्पर्धा जास्त असल्याने संबंधित शेतक-याचे कांद्यास रु.5200/- बाजारभाव मिळाले. यावर उपस्थित शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. तसेच उन्हाळ कांद्याची देखील नियमित आवक होत असुन त्यांस रु. 2000 ते 4570 व सरासरी रु. 4330 पर्यंत बाजारभाव मिळाले आहेत.

चांदवड येथे कांदा विक्रीची रक्कम तात्काळ रोख स्वरुपात अदा करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी चांदवड येथे माल विक्रीस आणतात. तरी शेतकरी बांधवांनी आपला कांदा शेतीमाल प्रतवारी करुन चांदवड येथे मोठ्याप्रमाणात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री.संजय जाधव, उपसभापती डॉ.वैशाली शामराव जाधव, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, सर्व संचालक मंडळ व कांदा व्यापारी असोशिएशन यांनी केले आहे.

