[masterslider id="2"]
राष्ट्रीय संमिश्र वार्ता

‘ व्हॉट्सअप पे ‘ कसे सुरू करायचे ?

भारतातील सर्वाधिक वापरण्यात येत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपवरून आता केवळ संवाद नाही , तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत . गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेली व्हॉट्सअपची पेमेंट सुविधा ‘ व्हॉट्सअप पे ‘ नुकतीच भारतात सुरू झाली आहे . भारतात ही सेवा सुरू करण्यासाठी व्हॉट्सअपला तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली . नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच ‘ एनपीसीआयने व्हॉट्सअपला आर्थिक व्यवहारांबाबत परवानगी दिली . भारतात व्हॉट्सअपची पेमेंट सुविधा वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे , अशी माहिती फेसबुक इंडियातर्फे देण्यात आली . भारतात जवळपास व्हॉट्सअपचे जवळजवळ ४२ कोटी वापरकर्ते आहेत ; त्यापैकी सध्या केवळ दोन कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे . विशेष म्हणजे , व्हॉट्सअपवरून इतर कोणत्याही यूपीआय प्लॅटफॉर्मवर पेमेंट करता येणार आहे .

‘ व्हॉट्सअप पे ‘ कसे सुरू करायचे ?

1 ) सर्वप्रथम एप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून तुमचे व्हॉट्सअप अपडेट करा . त्यानंतर व्हॉट्सअपच्या होमपेजला वर उजव्या

2 )  बाजूला तीन टिंब दिसतील . त्यावर क्लिक केल्यावर सेटिंग पर्यायावर क्लिक करा .

3 )  सेटिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट हा पर्याय दिसेल .

( सध्या हा पर्याय केवळ दोन कोटी वापरकर्त्यांनाच उपलब्ध आहे . )

4 )  पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ एड न्यू पेमेंट मेथड ‘ हा पर्याय दिसेल ; त्यावरून तुम्हाला तुमची बँक आणि बँक खात्याची माहिती समाविष्ट करावी लागेल .

5 ) बँकांच्या यादीतून तुमची बँक निवडल्यानंतर तुमच्या बँक खात्याची पडताळणी केली जाईल . त्यासाठी ‘ व्हेरिफाय व्हाय एसएमएस ‘ पर्यायावर क्लिक करावे .

6 )  त्यासाठी तुमचा व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्याला जोडलेला क्रमांक एकच असणे अत्यावश्यक आहे . बँक व्हेरिफिकेशननंतर फिनिश पेमेंट सेटअपवर क्लिक केल्यानंतर अन्य अॅप्समध्ये दिलेल्या माहितीनुसार यूपीआय पिन सेटअप करण्याचा पर्याय दिसेल .

8 )  ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअप मेसेजप्रमाणे पैसे पाठविता येतील .

लेखकाबद्दल

पत्रकार किशोर निकम

एक टिप्पणी द्या