[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आगामी नगर परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा – दिगंबर गिते

चांदवड (प्रतिनिधी विक्रम देवरे  ) : – चांदवड नगर परिषदेसाठी निवडणूक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची संधी असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या व पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून या दृष्टीने नियोजन करणे महत्त्वाच्या असल्याने पक्षातर्फे त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे तरी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन चांदवड येथे एनडीसीसी बँकेच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व चांदवड नगरपरिषदेचे पक्षनिरीक्षक दिगंबर गिते यांनी सांगितले.
यावेळी चांदवड येथील कार्यकर्त्यांच्या वतीने अनिल कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रस्तावना करताना चांदवड तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितले कि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तरुण उमेदवार कामाला लागलेले आहे, कोतवाल साहेबांचा विकास कामांचा अनुभवाचा फायदा मोठ्या प्रमाणात उमेदवारांना मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण  १७  उमेदवार उभे करण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी तरूण कार्यकर्त्यांनी जोमाने सर्वशक्तीनिशी कामाला, लागावे. तरुणांना संधी दिली जाईल विविध अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न पक्षपातळीवर करू. कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी मदत करून सामाजिक सेवा करावी व कागदपत्रांची जुळवाजुळव करावी तर आभार कार्याध्यक्ष समाधान जामदार यांनी मानले. 
चांदवड नगर परिषदेच्या निवडणूकीबाबत महत्त्वाच्या बैठकीत , तालुका अध्यक्ष संजय जाधव, समाधान जामदार, भिमराव जेजुरे, नंदकुमार कोतवाल, बाफना सर, अनवर पठाण, अनिल कोतवाल, गोपाळ लहणगे, शिवाजी कासव, संजय शेळके, राहुल कोतवाल, कैलास कोतवाल, संतोष बडोदे, गोकुळ देवरे,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या