[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद लेख विशेष लेख

माळराणातील रहाळी झाप

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आपल्या माळरानातील शेतीची देखभाल करणारा कष्टकरी माणूस त्याच्या दैनंदिन परिस्थितीला सामोरे जाताना गावं वाड्यापाड्याशी जिव्हाळा ठेवून निसर्ग नियमाला धरून त्याची नाळ आता माळरानातील शेतामध्ये संबंध जुळलेली दिसते शीवाय त्याने माळरानातच्या सहवासातच झाप बांधून स्वच्छंदी जीवन जगण्याचे दरशवलं आहे हे जीणं जगतांना तीथच त्याने आपल्या खटल्या बरोबरच स्वताची जितराब कुत्रं, मांजर,गाय,बैल,शेळी,रेडा,त्या सोबतीला कुक्कुट पालन व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टींचा गोतावळा निर्माण केला आहे खेडोपाड्यात राहिलं तर आपापसात वाद तंटे होतात त्यापासून दुर राहणे बरे असते ही मनोभावना जपुन प्रथम माळरानातील झापाला पसंती दर्शवली असावी

माळराणातील रहाळी झाप

बाप

शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळायासाखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप?
माझा बाप शेतकरी
उभ्याजगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्याहाती
दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं
मायपेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !
                                                                         – इंद्रजीत भालेराव 

इंद्रजीत भालेराव 

इंद्रजीत भालेराव

ही मराठीतील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता प्रथम 1999 मध्ये इयत्ता पाचवीसाठी अभ्यासक्रमातील आली ही कविता शेतकऱ्यांचे दुःख शोषण साकारत शेती ,माती मध्ये फुलतं तर गेलीच पण काव्याचा भावार्थ लक्षात घेता ती आजच्याही ग्रामीण संस्कृतीमध्ये वास्तविक जीवन जगणाऱ्या शेतामध्ये उन्हातान्हात राबणाय्रा बळीराजा बरोबरही मिळतीजुळती झाली आहे पुर्वी गावातील वाड्यापाड्यावर निवांत राहुन आपल्या माळरानातील शेतीची देखभाल करणारा कष्टकरी माणूस त्याच्या दैनंदिन परिस्थितीला सामोरे जाताना गावं वाड्यापाड्याशी जिव्हाळा ठेवून निसर्ग नियमाला धरून त्याची नाळ आता माळरानातील शेतामध्ये संबंध जुळलेली दिसते शीवाय त्याने माळरानातच्या सहवासातच झाप बांधून स्वच्छंदी जीवन जगण्याचे दरशवलं आहे हे जीणं जगतांना तीथच त्याने आपल्या खटल्या बरोबरच स्वताची जितराब कुत्रं, मांजर,गाय,बैल,शेळी,रेडा,त्या सोबतीला कुक्कुट पालन व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टींचा गोतावळा निर्माण केला आहे खेडोपाड्यात राहिलं तर आपापसात वाद तंटे होतात त्यापासून दुर राहणे बरे असते ही मनोभावना जपुन प्रथम माळरानातील झापाला पसंती दर्शवली असावी कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता शेतकऱ्यांचे ही वास्तविक जीवनातील माणुसकीचे पदर उकलणारी आहे तिच्या डोळ्यात परिस्थितीच्या उपक्रमाचे अश्रू असले तरी शोषणाच्या विरोधात आग असल्याचे दिसते .शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी शेतकरी एकट्याच नाही निसर्गाच्या सान्निध्यात राहिलेले घटकांचाही विचार करतो परंतु आजच्या गुंतागुंतीच्या काळातील कष्टकरी बाप घाम गाळून शेतात धान्य पिकवतात पण त्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.कवी भालेराव यांची कविता शेतकऱ्यांचे दुःख साकारलेली आणि आजच्या समाज हिताच्या दृष्टीने आव्हान करणारी आहे हे आजही जाणीवपूर्वक सिध्द होते

–  सुभाष नारायण कामडी,  मु वांगण सु पो पळसण,  ता सुरगाणा,

       मो नं 9579543308

 

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

टिप्पणी

एक टिप्पणी द्या