शिंगवे सोसायटीच्या चेअरमनपदी संजय अहिरे तर व्हा. चेअरमनपदी
मधुकर झाल्टे बिनविरोध

माजी सरपंच तुकाराम तात्या खताळ, सरपंच शरद पाटील, माजी सरपंच जिभाऊ खताळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रभान मढे, चांदवडचे दिपक बोडखे, नांदगाव तालुका माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र देवरे, शिंगवे मुख्याध्यापक आवारे सर, साळुंखे सर, सुखदेव बोरसे, राजाभाऊ माळवतकर, विठोबा खताळ , तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी
चांदवड (प्रतिनिधी ) : – चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शिंगवे येथील मतोबा महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी निवडणूकीबाबत विशेष बैठक घेण्यात आली. याप्रसंगी चेअरमन पदासाठी संजय सखाराम अहिरे व व्हा चेअरमन पदासाठी मधुकर दगडु झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. 
या बैठकीत प्राधिकृत अधिकारी एस. जी. खैरणार यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले त्यांना सहाय्य सचिव वाल चंद्र राजोळे यांनी केले. चेअरमन पदासाठी संजय अहिरे यांनी अर्ज सादर केला त्यांना सुचक म्हणून संजय खताळ अनुमोदक म्हणून नामदेव ठाकरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या तर व्हाईस चेअरमन साठी मधुकर झाल्टे यांनी अर्ज सादर केला त्यांना सुचक म्हणून जगन्नाथ खताळ अनुमोदक म्हणून संध्या माळवतकर यांनी स्वाक्षरी केली. यावेळी दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरल्याने व दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी खैरनार यांनी अहिरे व झाल्टे यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी माजी सरपंच तुकाराम तात्या खताळ, सरपंच शरद पाटील, माजी सरपंच जिभाऊ खताळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रभान मढे, चांदवडचे दिपक बोडखे, नांदगाव तालुका माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र देवरे, शिंगवे मुख्याध्यापक आवारे सर, साळुंखे सर, सुखदेव बोरसे, राजाभाऊ माळवतकर, विठोबा खताळ , तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सदर बैठकीस सोसायटी संचालक मंडळामध्ये जेष्ठ संचालक संजय खताळ, जगन खताळ, मधुकर झाल्टे, ठकुबाई मढे, नाना गुंड, सौ. सुमनबाई खताळ, संध्या माळवतकर, नामदेव ठाकरे, रघुनाथ खताळ, देवमन गुंड, चिंतामण मढे हे संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सोशल डिस्टिंक्शनचे नियम पाळत निवडोत्सव साजरा करण्यात आला.

