[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांचे चांदवड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत व सत्कार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांचे चांदवड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत व सत्कार

मागण्यांचे निवेदन सादर

चांदवड ( प्रतिनिधी) –

जयवंतराव पाटील (जलसंपदा मंत्री ) हे नांदगावहुन चांदवडकडे परिवार संवाद यात्रेकरिता येत असतांना काँग्रेस पक्षातर्फे त्यांचें चांदवड-मनमाड रोडवरील माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांच्या शेतातील निवासस्थानी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांचा सत्कार माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल ,चांदवड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव ,राहुल कोतवाल, जिल्हा सरचिटणीस कॉग्रेस शिवाजी बाबुराव कासव , काँग्रेसचे प्रांतीक सदस्य भिमराव जेजुरे, चांदवड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार, उपाध्यक्ष बापू शिंदे, नंदकुमार कोतवाल,विजय सदेडे, आदींनी केला.
यावेळी त्यांना पक्षातर्फे विविध मांगण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,
खालील गोष्टींचा चांदवड तालुक्याच्या व शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून विचार व्हावा . केंद्राई ( खडक ओझर ) धरणापासून ते दरसवाडी धरणापर्यंत असलेला पाट ( कालवा ) रुंदीकरण व्हावे , त्यामुळे दरसवाडी धरण भरण्यास मार्ग मोकळा होईल व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेले छोटे – मोठे पाटबंधारे विभागातील धरणे भरण्यास मदत होईल , राहूड धरणापासून दुगाव पर्यंत पाण्याच्या चारीचे रुंदीकरण व्हावे . दरेगाव निमोण वागदडी डोणगाव पर्यंत नवीन पाट चारीचे काम करून मिळावे, पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात मार्चमध्ये एक रोटेशन सोडण्यात यावे . सततधार पाउसामुळे द्राक्षबाग , डाळिंब व इतर शेतमालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून पिक निहाय नुकसान भरपाई मिळावी . सदर पिकांचे पंचनामे करून द्राक्षबागेसाठी दोन लाख रुपये व इतर शेतमालासाठी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे निवेदनावर माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल ,चांदवड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव ,राहुल कोतवाल, जिल्हा सरचिटणीस कॉग्रेस शिवाजी बाबुराव कासव , काँग्रेसचे प्रांतीक सदस्य भिमराव जेजुरे, उपाध्यक्ष बापू शिंदे, नंदकुमार कोतवाल,विजय सदेडे, चांदवड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या