[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नांदगाव शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला नामदार जयंत पाटील यांचे स्वागत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा

यांनी लिहिलेले अरुण हिंगमिरे

नांदगाव शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला नामदार जयंत पाटील यांचे स्वागत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नांदगाव येथे आले होते. जयंत पाटील महाविकास आघाडीचे मंत्री असल्याने नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या आदेशाने नांदगाव शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामदार जयंत पाटील यांचे हारगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी शिवसेना ता.प्रमुख किरण देवरे कृ. उ.बा.समिती सभापती तेज कवडे,संतोष गुप्ता,विष्णू निकमसर,शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव,युवासेना ता.प्रमुख सागर हिरे,शहर प्रमुख मुज्जू शेख,नगरसेवक कारभारी शिंदे,सचिन साळवे,आनंद कासलीवाल,बाळासाहेब शेवरे,रवी पवार,अमोल नावंदर,भैया पगार,भाऊराव बागुल, अय्याज शेख

लेखकाबद्दल

अरुण हिंगमिरे

एक टिप्पणी द्या