ग्रामीण साहित्यिक : आनंद यादव
आनंद रतन यादव हे एका ग्रामीण लेखकाच नाव आहे त्यांचा आज जन्मदिन त्यानिमित्ताने थोडक्यात त्यांच्या साहित्य विश्वाबद्दल घेतलेला धांडोळा.
आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कागल जि.कोल्हापूर येथील शेतकरी कुटुंबात झाला कागल परीसर हा ग्रामीण तालुका म्हणून यादवांच्या साहित्यामध्ये ग्रामीण मानवी हे मोठ्याप्रमाणात स्थानबद्ध झाले आहे यादवांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात ही कागलमधूनच झाली अभावग्रस्त कुटुंबातून आलेल्या मानसाच्या गळ्यात जणुकाही संघर्ष, हालपेष्टा, दारिद्र्य,यातूनच यशस्वी जीवनाची खरीखुरी सप्तपदी पूर्ण होईपर्यंत नियतीच्या हातातील बाहुले बनूनही बेतलेली परिस्थितीचे बसणारे चटके सोसत ध्येयाने न खचता मात करण्यासाठी ताईतच गळ्यात जणुकाही बांधून ठेवले असावे हे उदाहरण म्हणजे यादवांनी लिहलेली झोंबी आत्मचरित्रात्मक कादंबरी, मुलाची शाळा शिकण्याची इच्छा आहे परंतु घरात अडचणींचे निराकरण करण्यासाठी बेतलेली परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्याने खंगलेला प्रपंच त्यामुळे मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्धार अशाच परिस्थितीत दहावीला असताना यादवांचा दहावीला असतांनाचा प्रसंग झोंबी आत्मचरित्रात्मक कादंबरीतून साकारलेला आहे
गावातील, खेड्यातील, शेतकरी जीवन, चालीरीती, परंपरा,यालाच ग्रामीण संस्कृती म्हणतात यादवांच्या साहित्यामध्ये आधुनिक काळातील शेतकरी, सावकारी, माळरान, निसर्गसौंदर्य,अडाणी जीवन, प्राणी जीवन, सुख, दुःख, इ घटक साहित्य वाचताना लक्ष वेधून घेतात गोतावळा ही त्यांची १९७२ साली दुष्काळी भागावर प्रकाशित झालेली कादंबरी ह्या कादंबरीतील नारबा ह्या कष्टाळू व मंदबुद्धीच्या तरुणांचं चित्रण आहे तो नेहमीच प्राण्यांच्या घोळक्यात फिरायचा त्यामुळे सारे प्राणी गोतावळ्यात राहणे तितकेच त्याला आवडले म्हणून गोतावळा कांदबरी नावाला आली यादवांच्या पुढे नटरंग, एकलकोंडा, कलेचे कातडे, माऊली, संतसुर्य, अशा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या संत तुकाराम ही तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील कादंबरी त्या कादंबरीवर वारकऱ्यांच्या मध्ये वाद झाल्यानंतर २००८ साली महाबळेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही यादवांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता यादवांचे कथासंग्रह म्हणजे ग्रामीण भागातील माणसांचे अबोलपणे हितगुज साधणे जसे एखाद्या पाण्याच्या डोहात समोरच्या निसर्ग सृष्टीचे सौंदर्य हुबेहूब प्रतिबिंब दिसते तसे गावातील खेड्यातील झोपडीतील चावडीवरील व्यक्तीचे वेगळेपण स्वभाव यांचे चित्रण तंतोतंत लागू पडते त्यांचे आदिताल, उखडलेली झाडे, खळाळ, झाडवाटा, घरजवाई, डवरणी, भूमिकन्या, माळावरची मैना, शेवटची लढाई इ कथासंग्रहात ग्रामीण विश्व व्यापले आहे काव्यसंग्रह हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकर इ वैचारिक लेख संग्रह समिक्षन्मक ग्रंथ १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्याचे नवे प्रवाह, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण स्वरुप आणि वास्तव, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या, पानभवरे, मराठी लघुनिबंध इतिहास मराठी साहित्य समाज आणि संस्कृती , साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्यिक जडण घडण, साहित्यिकाचा गाव, स्पर्श कमळे, व्यक्तीचित्रणं मातीखालची माती,,काचवेल, घरभिंती, नांगरणी, बालसाहित्य,उगवती मने, रानमेवा, सैनिक हो तुमच्यासाठी, इ विपुल ग्रामीण साहित्य लेखनसंपदा डॉ आनंद यादव यांच्या नावे आहे त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे वाड्मयीन पुरस्कार देऊन सन्मानित केले १९९० साली झोंबी आत्मचरित्रात्मक कादंबरीला भारत सरकारने साहित्य अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यांनी ग्रामीण साहित्य संमेलन, पहिले समरसता साहित्य संमेलन, २००८ साली महाबळेश्वर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाली होती शीवाय त्यांनी दिर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलं विद्यापती, विद्यावाचस्पती, पदवी करीता संशोधनाच्या अनुषंगाने यशस्वी मार्गदर्शन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागात १९९१ -१९९५ दरम्यान विभाग प्रमुख म्हणून काम सांभाळून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१३ साली साहित्यातून निवृत्ती घोषित केली २७ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांचे पुन्यात वृध्दपकाळाने निधन झाले त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.
सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं ९५७९५४३३०८
टिप ३० नोव्हेंबर हा साहित्यिक आनंद यादव यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने थोडक्यात लेख आहे

