ओमोक्रोनचा संसर्ग वाढु नये म्हणून दत्ताचे शिंगवे येथील यात्रा रद्द

चांदवड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख महानुभव धर्मियांचे श्रद्धास्थान आणि प्रति गाणगापूर समजल्या जाणाऱ्या परिसरातील शिंगवे येथील श्री.क्षेत्र दत्त यात्राउत्सव कोरोना आणि ओमोक्रोन संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने याही वर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिराचे विस्वस्थ कृष्णा शेवलेकर यांनी दिली आहे. 
जागृत देवस्थान म्हणून जिल्हयातील पूर्व भागातील पहिली यात्रा म्हणजे श्री.क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथील श्री दत्त जयंती निमित्ताने मोठी यात्रा भरते.तीन दिवस मुख्य यात्रा भरते.सुमारे दहा दिवस भरणारा हा यात्राउत्सव गेल्या दोन वर्षापासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीमुळे यात्रा उत्सवावर अनेक बंधने आली असून या ही वर्षी कोरोनाच्या नविन विषाणू ओमोक्रोनच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी जवळपास सर्व यात्रा बंद करण्याचे आदेश काढले असून दत्त जयंतीला भरणारा येथील यात्रा उत्सव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.
तर फक्त दर्शन परवानगी देण्यात आली असून त्यातही कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करुन दर्शन परवानगी देण्यात आली आहे.मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे असून सुरक्षित अंतर ठेवणे, सानिटायझरचा वापर करणे,दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात न थांबणे व गर्दी न करणे आदी नियमाचे पालन करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहे.सदर दर्शन यात्रा शनिवार १८,१९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजात श्रीदत्त पालखी मिरवणूक होणारा आहे.यात्रा काळात मिठाई, प्रसाद,पूजा साहित्य,खेळणी,पाळणे इत्यादी दुकाने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.तसेच पूजा साहित्य भाविकांनी येतानांच घेऊन यावे असेही म्हटले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर करवाई करण्यात येईल असेही येथील मंदिरांच्या विस्वस्त यांनी आवाहन केले आहे.तर शासनाच्या नियमचाचे पालन करताना करून भाविकांनी मंदिर विस्वस्त आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस, सरपंच,ग्रामपंचायत मेसनखेडे खुर्द,श्री दत्तमंदिर ट्रस्ट यांनी केले असून तसे नियोजन ही करण्यात आले आहे.

