चांदवड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजीराव सोनवणे यांनी दरेगाव येथे धनदाई मंदिरात भेट देऊन प्रस्तावित पाण्याचा टाकीच्या जागेची पाहणी केली. सदर जागेवर पाणी पुरवठा टाकी व्हावी, अशी मागणी काही महींन्यापुर्वी दरेगाव सोसायटी चेअरमन विक्रम देवरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेसनखेडे गणप्रमुख रावसाहेब देवरे,मेसनखेडे सहगणप्रमुख दत्तु पगार, विठ्ठल देवरे,धनदाई देवी भाविक मंडळी व दरेगाव ग्रामस्थ यांनी केली होती. अखेर शब्दाला जागत उपसभापतींनी अखेर येथे पाच हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा टाकी मंजूर केली आहे.
पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या पाणीपुरवठा बंदीत निधीतून सुमारे एक लाख विस हजार रुपये खर्च करून पाच हजार लिटर क्षमतेची टाकीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. तसेच त्यांनी गावात अन्य ठिकाणीही जिथे गरज असेल त्या जागेवर दहा हजार लिटर क्षमतेची टाकी मंजूर केली असुन त्यासाठी दोन लाख सहासष्ठ हजार सातशे रूपये मंजूर करण्यात आले आहे.धनदाई मंदिर परिसरात उपसभापतींनी भेट दिली असता यावेळी त्यांच्या समवेत रवी जेजुरे, विक्रम देवरे, दत्तु पगार, सुखदेव देवरे,शंकर गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

