[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

डोणगाव उपसरपंचपदी विक्रम वाघ यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

डोणगाव उपसरपंचपदी विक्रम उत्तम वाघ यांची बिनविरोध
निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीने यापुर्वीच्या उपसरपंच संगिता अर्जुन शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेवक विशाल सोनवणे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. या जागेसाठी एकमेव विक्रम वाघ यांचा अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली.  या निवडीबद्दल
त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला .निवडीप्रसंगी सरपंच मुरलीधर( जगदीश ) यशवंतराव शेळके तसेच माजी उपसरपंच अंबादास वामन जेजुरे, निवृत्ती केदु शेळके, नंदा खंडू शिंदे, संगीता अर्जुन शेळके, सविता सुभाष वाघ ,पमाबाई वामन कडवे, रवींद्र रुंझा जेजुरे, अर्जुन भिला शेळके, सुभाष वाघ , विनोद शेळके तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sending
User Review
6.5 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या