[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नागापूर येथे महाशिवरात्री निमित्त नागेश्वर मंदिरात अलोट गर्दी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मनमाड पासून जवळच असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागापूर येथील नागेश्वर मंदिरात जाऊन भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून यात्रा महोत्सव होऊ शकला नव्हता. मात्र या वर्षी कोरोनाची लाट ओसरल्याने सोमवारी रात्री बारा वाजेपासुनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिवरात्रीला दिवसा व रात्री उशिरापर्यंत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकांणाहुन भाविक भक्तांनी हजेरी लावली.महंत रामचंद्र पुरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर येथील ग्रामस्थांनी यात्रेचे सुंदर नियोजन केले होते.
विविध खेळण्यांची दुकाने नागरिकांची लक्ष वेधत होते.
कै.तुकाराम खेडेकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा तमाशाच्या कार्यक्रम 28 फेब्रुवारी रोजी रात्री पार पडला. तर कुस्त्यांची विराट दंगल 3 मार्च रोजी नागापूर येथे होणार आहे,अशी माहिती नागापुरचे सरपंच सुधाकरअप्पा पवार यांनी दिली आहे.यावेळी मनमाडचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय. जाभळे साहेब,पोलिस हवलदार माने साहेब पोलिस नाईक शेख, बस्ते,महिला पोलीस शिपाई वरपाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.त्यांचा सत्कार नागापूर मंदिरातील महंत रामचंद्र पुरीजी महाराज व सुधाकरअप्पा पवार यांनी केला.

Sending
User Review
4.2 (5 votes)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या