महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना चांदवड तालुका अध्यक्षपदी प्रवीण निरभवणे तर जिल्हा प्रतिनिधी पदी डी.सी. जाधव व जिल्हा महिला प्रतिनिधी पदी चंद्रकला पगार यांची निवड करण्यात आली.
चांदवड तालुका महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार निवडून येतील या खात्रीनेच निवडणूक रिंगनात उतरले होते.त्यानुसार जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा महिला प्रतिनिधी,तालुका अध्यक्ष यांचे अर्ज भरण्यात आले परंतु यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने यांच्यासह उर्वरित सर्व पदांची बिनविरोध निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी धनेश मेचकुल,उपाध्यक्षपदी अश्विनी जवरे,दीपक खैरे,श्याम वाघ, सचिवपदी वाय.टी.दमाले, कोषाध्यक्षपदी संदीप वाघ, खजिनदारपदी भरत वानखडे तर संघटक पदी छगन सोनवणे,कवलजीत नगराळे,एस.आर.आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयंत सोनवणे,सचिन जाधव,रोमा आहेर,संगीता बोंडे,सुवर्णा पवार,ललिता कापडणीस,अर्चना देशमुख,प्रवीण चौधरी,नारायण शिंदे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.


ग्राम चैतन्य साप्ताहिक मध्ये स्थानिक व संमिश्र बातम्या खुपच छान असतात