[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रस्ते दुरुस्तीसाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर:  भाजपा गटनेते डॉ आत्माराम कुंभार्डे यांची माहिती

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

तळेगांवरोही गटातील दळणवळण होणार गतिमान

 

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गटासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधीन विशेष दुरुस्ती कार्यक्रम ( ग्रामीण ) योजने अंतर्गत सन 21 – 22 या आर्थिक वर्षासाठी गटातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल साडे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने गटातील दळणवळण जलद गतीने होणार असून जनतेचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याची माहिती जि प सदस्य तथा भाजपा गटनेते आत्माराम कुंभार्डे यांनी ही माहिती दिली.
तळेगाव रोही गटातील दक्षिणेकडील निम्म्या गावांचा दळणवळणाचा भार लासलगाव बाजार समितीशी तर उत्तरेकडील गावांचा दळणवळणाचा भार हा चांदवड बाजार समितीशी निगडीत असल्याने शेतमालाची मोठ्या प्रमाणात ने आण होत असते. त्यामुळे गटातील रस्ते दुरुस्त होणे आवश्यक होते जनतेची ही गरज लक्षात घेता डॉक्टर कुंभार्डे यांनी जिल्हा परिषदेत याचा भक्कम पाठपुरावा केल्याने त्यांच्या पदरात मोठा निधी पडला यामध्ये चांदवड बोपाने रस्ता सुधारणा करणे 25 लाख गणुर निमगव्हाण रस्ता सुधारणा करणे 25 लाख हिरापूर दिघवद रस्ता सुधारणा करणे 25 लाख निंबाळे ते 109 चौकी नंबर रस्ता सुधारणा करणे 25 लाख परसुल बोपाने दिघवद रस्ता सुधारणा करणे 25 लाख वाहेगाव साळ ते शास्त्रीनगर रस्ता सुधारणा करणे 25 लाख काजी सांगवी ते नन्हावे रस्ता सुधारणा करणे 25 लाख पन्हाळे विटावे रस्ता सुधारणा करणे 16 लाख रायपूर समिट रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा करणे 25 लाख गणुर तळवाडी पाईप मोरी बांधणी तीन लाख रुपये रायपूर ते कातरणी रस्ता सुधारणा करणे 17 लाख वायगाव ते मायंबा शास्त्रीनगर रस्ता सुधारणा करणे 16 लाख रायपूर समिट रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा करणे 18 लाख निंबाळे ते चौकी नंबर 109 रस्ता सुधारणा करणे 21 लाख चांदवड बापाने रस्ता सुधारणा करणे पंचेचाळीस लाख चांदवड ते पाथरशेंबे पन्हाळे गंगावे निंबाळे कातरणी रस्ता सुधारणा करणे 39 लाख टाकळी पिंपळद वाहेगाव साळ काळखोडे तळेगाव रोही पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे एक कोटी 49 लाख रुपये रायपूर गंगावे रस्ता सुधारणा करणे 45 लाख पाटे रेडगाव साळसाने रस्ता सुधारणा करणे 45 लाख काळखोडे तळेगाव रोही कातरणी रस्ता सुधारणा करणे एक कोटी हिरापूर दिघवद रस्ता 25 लाख रुपये याप्रमाणे गटातील रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर झाल्याने दळणवळणाच्या बहुतांशी समस्या सुटणार असून प्रवास गतिमान होईल तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीत सुरळीत पोहोचेल. यामधील बऱ्याचशा रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून काही रस्त्यांची कामे 80 ते 90 टक्के झालेली असून उर्वरित रस्त्यांचीही कामे मार्च एप्रिल अखेर पूर्णत्वास नेण्याचा मानस असल्याचे डॉ कुंभार्डे यांनी सांगितले. तसेच रस्ता दुरुस्तीसह गटातील अनेक गावांना अंगणवाडी आणि शाळा दुरुस्तीची ही कामे मंजूर झाली आहे हिरापूर 5 वर्गखोल्यासाठी 48 लाख रायपुर शाळा इमारत बांधणे 48 लाख उर्धुळ दोन वर्गखोल्या बावीस लाख या आर्थिक वर्षात मंजूर झाले आहे.
गटातील अनेक शाळा वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी आवश्यक होता तोही उपलब्ध केला आहे शाळा दुरुस्ती करणे सात लाख हिरापुर शाळा दुरुस्ती चार लाख धनगरवाडी इमारत दुरुस्ती दोन लाख प्राथमिक शाळा पन्हाळे दुरुस्ती करणे व इमारत बांधणे एक लाख 80 हजार हिवरखेडे इमारत दुरुस्ती सहा लाख तळेगाव इमारत दुरुस्ती पाच लाख आडगाव इमारत दुरूस्ती पाच लाख हरसुल शाळा दुरुस्ती पाच लाख यासह काजी सांगवी येथे वश्या मारुती येथे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी साडेआठ लाख पाटे येथे अंगणवाडी बांधणे साडेआठ लाख विटावे येथे साडेआठ लाख कातरवाडी येथे साडेआठ लाख गणुर येथे साडेआठ लाख लाख याप्रमाणे गटातील सर्वच कामांचा समतोल साधण्यासाठी सर्व विभागांकडे पाठपुरावा करून कुंभार्डे यांनी बख्खळ निधी पदरात पाडून घेतला आहे त्यामुळे गटामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या स्वरूपाची कामे सुरू असल्याचे दिसत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या