[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

धोंडगव्हाण वाडी येथील विहिरीत आढळला मृतावस्थेतील बिबट्या

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सोमवार दिनांक १८ एप्रिल , २०२२ रोजी सकाळी मौजे धोंडगव्हाण वाडी , ता . चांदवड येथील शेतकरी श्री . योगेश सुरेश बस्ते यांनी वनपाल / वनरक्षक – वडनेर भैरव यांना दुरध्वनी संदेशान्वये माहिती दिली की , त्यांच्या मालकी गट नं . १० / ड मधील विहीरीत एक बिबट हा वन्यप्राणी मृतावस्थेत पडलेला नजरेस आला असल्याच्या संदेशानुसार वन परिक्षेत्र अधिकारी श्री . संजय वाघमारे , चांदवड , वनपरिमंडळ अधिकारी – वडनेर भैरव श्री . देविदास चौधरी , वनरक्षक वडनेर भैरव श्री . विजय टेकनर , वनरक्षक पारेगांव श्री . वाल्मिक व्हरगळ , वनमजूर श्री . वसंत देवरे , तसेच वाहन चालक श्री . अशोक शिंदे यांचे सह घटनास्थळी तात्काळ पोहचले . त्या ठिकाणी वरील मालकी गट क्र .१० / ड मधील विहीरीत डोकाऊन पाहिले असतां बिबट हा वन्यप्राणी विहीरीत मृतावस्थेत विहीरीतील पाण्यात तरंगलेला दिसून आला . स्थानिकांच्या मदतीने विहीरीमध्ये दोरखंडाच्या सहाय्याने खाट सोडून त्यावर सदर मृत बिबट वन्यप्राण्याचे शव ठेऊन त्यास बाहेर काढले . सदर बिबट ( अंदाजे वय ४ ते ५ महिने ) शासकीय वाहनाने वडनेर भैरव येथे आणून पशुधन विकास अधिकारी , वडनेरभैरव डॉ . श्री . काटे यांचेकडून शवविच्छेदन करण्यांत आले . प्रसंगी सरपंच धोंडगव्हाण वाडी व परिसरातील इतर शेतकरी यांनी वनविभागास सहकार्य केले . सदर बिबट्याचे शव शासकीय वाहनाने चांदवड येथे वन वसाहतीमध्ये आणून दहन करण्यांत आले .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या