उसवाड सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांची निवड
चांदवड तालुक्यातील उसवाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. ता.चांदवड या सोसायटीच्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड यांच्या शेतकरी विकास पँनलने सर्व जागा जिंकून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. सोसायटीच्या विजयानंतर डॉ सयाजीराव गायकवाड यांची उसवाड सोसायटीच्या चेअरमनपदावर निवड झाली आहे. प्रकाश आण्णा बिडगर बिडगर यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सोसायटीच्या कर्जदार गटात गायकवाड अशोक नारायण ,गायकवाड रावसाहेब एकनाथ,पवार माधव गंगाधर,पवार सुभाष माधव,बच्छाव अंबादास केदू,बिडगर जयप्रकाश बाबुराव,बिडगर जिजाबाई केदू ,शिंदे भाऊसाहेब चिंधु ,ओ.बी.सी.गटात गायकवाड सजाजी नारायण ,एन.टी.गटात बिडगर जिभाऊ गंगाधर, अनुसूचित जाती जमाती गटात बटाव कल्पना संजय, महिला प्रतिनिधी म्हणून गायकवाड मंगलाताई जगन्नाथ , पवार लिलावती मधुकर, यांची संचालकपदी वर्णी लागली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदवडचे सहकार अधिकारी ( द्वि.श्रे. ) श्री.नितीन पाटील यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना सहाय्य सहाय्यक निवडणूक अधिकारी संस्थेचे सचिव श्री. विजय गायकवाड यांनी केले.विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
मा.जि.प.उपाध्यक्ष डॉ.श्री.सयाजीराव गायकवाड यांची उसवाड वि.वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी व श्री प्रकाश आण्णा बिडगर बिडगर यांची व्हा.चेअरमनपदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी सत्कार करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी उपस्थितांमध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळ, उसवाड गावचे ग्रामस्थ यांचा समावेश होता.

