[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ करिअर मार्गदर्शन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ करिअर मार्गदर्शन

आज दिनांक २९ मे २०२२ रोजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले
या प्रसंगी मार्गदर्शक माननीय श्री दत्तात्रय विलास देवकर (शासकीय विधी महाविद्यालय मुंबई) यांनी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्र, कायदा , माहिती तंत्रज्ञान , कृषी क्षेत्राशी संबंधित तसेच विविध प्रवेश परीक्षा , स्पर्धा परीक्षा यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर कु कृष्णा चंदू खैरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे किंवा कोणकोणत्या संधी असतात तसेच प्रवेश परीक्षा स्पर्धा परीक्षा यासंदर्भात मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुण माळी हे होते तसेच कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक माननीय श्री बाजीराव खैरे, श्री चिंधु खैरे श्री पोपटराव सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पालकवर्ग व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस एम जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विसपुते सरांनी केले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या