अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी लग्न कहाणी
हळद रुसली आणि अर्ध्या वरती डाव मोडला मृत्यूची बातमी येताच वडनेरभैरव गावावर शोककळा
सुरेश माधवराव सलादे यांचा स्पेशल रिपोर्ट
वडनेर भैरव चे प्रगतशील शेतकरी रामभाऊ भालेराव यांचा मुलगा चेतन यांचे लग्न 10 मे 2022 रोजी निफाड तालुक्यातील नैताळे येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात जळगाव तालुका निफाड येथील शरद भास्करराव वडघुले यांची कन्या पूजा समवेत संपन्न झाले नवरदेव नवरी दहा तारखेला रात्री दोन वाजेच्या दरम्यान वडनेर भैरव ला पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हळद उतरविण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी नववधू पूजा हिला अस्वस्थ वाटू लागल्याने वडनेर भैरव, पिंपळगाव बसवंत त्यानंतर नाशिकला वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. तब्येतीत जास्तच अस्वस्थता असल्याकारणाने डॉक्टरांनी भालेराव परिवार व नववधू पूजाचे वडील शरद वडघुले व वडघुले परिवार यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर मुंबई येथे नेण्यात आले. परिवार आणि डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत वैद्यकीय उपचार केले ,परंतु एकोणवीस दिवसानंतर नववधू पूजाने मुंबई येथेच अखेरचा श्वास घेतला. पूजाच्या निधनाची बातमी चांदवड ,निफाड आणि दिंडोरी तालुक्यात पसरताच सर्व नातेवाईक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. सासरी केवळ आठ तासच आलेल्या सौ पूजा तिच्या अचानक मृत्यूच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसलेला आहे चांदवड चे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव ,दौलत हॉटेल चे संचालक दौलत नाना भालेराव यांची पूजा ही नात सून तर वडनेरभैरव सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ भालेराव ,वडनेर भैरव ग्राम पालिकेचे माजी उपसरपंच रावसाहेब भालेराव व चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भाऊ भालेराव तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक राजेंद्र भालेराव यांच्या त्या सुनबाई लागत होत्या वडनेर भैरव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अनेक क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीत सौ चंचल पूजा भालेराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .अंतिम संस्कार होत असताना सर्व उपस्थितांमध्ये सहानुभूती आणि हळहळ त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होती. डोक्याला पूर्वी कधीतरी इजा झाल्यामुळे सौ पूजा त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती .वडनेर भैरव येथे केवळ आठ तासांसाठी सौभाग्यवती म्हणून आलेली पूजा ही उच्चशिक्षित अशी नववधू अर्ध्यावरती भातुकलीच्या खेळा प्रमाणे नियतीने डाव मोडून एका लग्नाची अर्ध्यावरती कहाणी समाप्त झाली चेतन भालेराव हा अतिशय उत्तम व्यवसायिक त्याच्या जीवनात असा प्रसंग केवळ एका दिवसांनी घडावा याबद्दल अनेक जण आपली भावना व्यक्त करत होते चेतन भालेराव आणि दोन्ही परिवारा बरोबरच पूजा चे आई वडील यांच्या दुःखाला या घटनेने नक्कीच पारावार उरलेला नाही सायंकाळी वडनेर भैरव येथे पूजा वर अंत्यसंस्कार करण्यात आले

