महाविकास आघाडी तर्फे कांद्याला हमी भाव व इतर मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलनाच्या नियोजनासाठी चांदवडला बैठक संपन्न
महाविकास आघाडी तर्फे कांद्याला हमी भाव व इतर मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी व अडचणीत आलेल्या बळीराजाच्या व्यथा केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी चांदवडला शासकीय विश्रामगूर्हाच्या आवारात तीन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल ,माजी आमदार उत्तम बाबा भालेराव , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीनदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार दि . २/६/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा . मुंबई – आग्रा रोड , पेट्रोल पंपा समोर आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड व शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर हे आयोजक राहणार आहेत. या आंदोलनात कांदा प्रश्न हाच आंदोलनाचा प्रमुख केंद्रबिंदु असणार आहे तर इतर अन्य मांगण्यांसाठीही महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील जनतेसह आंदोलनात उतरणार आहेत.
- आगामी आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला ३००० रूपये हमी भाव व ५०० रूपये प्रति क्विंटल अनुदान मिळाले पाहिजे,
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगांव बं . येथे सन २०१ ९ मध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की कांद्याला हमीभाव देईल ( ज्याचे मिठ खाल्ले त्याला जागले पाहिजे ),
- खतांचे भाव प्रचंड वाढले आहे ते भाव कमी करण्यात यावे,
- गॅसचे भाव कमी करण्यात यावे ( सन २०१३ च्या काळात गॅस ३ ९ ० रूपये टाकी होते ते आज १००३ / – रूपये आहे ),
- डिझेल / पेट्रोल च्या भाव कमी करण्यात यावे ,
- खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले आहे ते कमी करण्यात यावे ,
- गव्हाची निर्यात बंद केलेली आहे ती पुन्हा चालु करण्यात यावी ,
- सोयाबीनचे आयात बंद करून निर्यात चालु करण्यात यावी ,
- घरकुलाचे अनुदान वाढवण्यात यावे ( वाढत्या महागाईमुळे घरकुलाचे अनुदान वाढवावे) ,
- कांदा चाळीला वाढत्या महागाईमुळे १,५०,००० / – अनुदान करण्यात यावे ,
- तालुक्यातील नविन रेशनकार्ड धारकांना रेशन चालु करण्यात यावे ,
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते की तरूणांना नोकऱ्या देऊ परंतु कोणतीही नोकरी न देता नोकऱ्या कमी करण्यात आलेल्या आहे तरी तरूण वर्गांना नोकरी उपलब्ध करून द्याव्यात
या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे .
सदर आंदोंलनाचे आयोजक चांदवड तालुका काँग्रेस कमिटी , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राहणार आहेत.
सदर बैठकीत चांदवडचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी नियोजनासंदर्भात अनेक मौलिक सुचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी गटनिहाय जबाबदारी पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी नियोजन केले.
यावेळी विजय जाधव, विजय गांगुर्डे,दशरथ ठाकरे, प्रकाश शेळके, शिवाजी बर्डे,ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी सोनवणे,संजय जाधव, भिमराव जेजुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर बैठकीस माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ . सयाजीराव गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितिनदादा आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्टे, सुनिल तात्या कबाडे , विजय जाधव , भिमराव जेजुरे, शिवाजी कासव , विजय गांगुर्डे , रिजवान घासी , प्रकाश शेळके, उत्तमराव ठोंबरे, रेवन ठाकरे, अरुण न्याहारकर, रंगनाथ थोरात, शहाजी भोकनळ, अल्त्ताफ तांबोळी, म्हसु गांगरे ,संदिप उगले , शिवाजी सोनवणे, डॉ. दिलिप शिंदे, कैलास सोनवणे, मतीन घासी, किसनराव साठे, दशरथ ठाकरे,दत्तात्रय वाघचौरे, विक्रम जगताच राजेंद्र ठोंबरे, जगदीश शेळके , डॉ शामराव जाधव, भिमराव निरभवने, भाऊसाहेब शेलार ,पंकज दखणे, बाळासाहेब मावळे, विकी जाधव, साहेबराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव , बापू शिंदे, श्रीराम शिंदे ,शिवाजी पगार, दिपक शिरसाठ, किरण आहेर, अॅड अन्वर पठाण, प्रकाश खेमनार, नंदुकुमार शिरसाट , साहेबराव जाधव, सुभाष जाधव आदी बैठकीत उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे यांनी मानले.

