जोपूळ येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
चांदवड-चांदवड तालुका छत्रपती शिवाजी महाराज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जोपुळ, ता. चांदवड येथे संपन्न झाल्या. यावेळी चांदवड तालुका कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, मा. श्री साईनाथ गिडगे, मा. विलास ढोमसे, पी.एस.आय. समीरजी बारवकर, भाजपचे जेष्ठ नेते मा. श्री बाळासाहेब वाघ, मा. निवृत्ती घुले, मा. विकास भुजाडे, मा. गोरखभाउ ढगे, मा. दिगंबर वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्रभरातून विविध वजनी गटातील 250 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. श्री. वसंत पगार, मा. शिवाजी मोरे, प्रा.अशोक ठोके, श्री. शंकर जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. या कुस्ती स्पर्धेत वजनानुसार एकूण अकरा गटातील कुस्तीपटूचे साखळी पद्धतीने कुस्त्या घेण्यात आल्या.
खुल्या गटात नारायण मार्तंड हा कुस्तीपटु जोपूळ केसरीचा मानकरी ठरला. तसेच या स्पर्धेत मुलींनीही सहभाग नोंदविला. हिरकणी प्रवीण खैरनार आणि सायली सतीश खैरनार या मुलींनीही छोट्या वजनी गटात सहभाग नोंदवून महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध केले.
स्पर्धेचे आयोजन डॉ. महेश वाघ, डॉ. नितीन जाधव, प्रा. शामराव पगार, प्रा. मंगेश ठोंबरे, श्री. मयुर वाघ, श्री. सुनिल जाधव यांनी केले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व जोपूळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत जोपुळ यांचे सहकार्य लाभले.

