[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड येथे जिल्हा भरारी पथक आढावा भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड येथे जिल्हा भरारी पथक आढावा भेट

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खते, बियाणे यांचा आढावा घेण्यासाठी कृषी निविष्ठा केंद्रांना भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा भरारी पथक तपासणी करतांना मा.रमेश शिंदे साहेब कृषी विकास अधिकारी जि.प.नाशिक, श्री विजय धात्रक साहेब कृषी अधिकारी यांच्या समितीने भेट देऊन आढावा घेतला.

चांदवड येथील जाधव आणि कंपनी येथे भेट देऊन खरीप हंगामातील येणाऱ्या अडचणींवर केली चर्चा 

“जिल्ह्यात सोयाबीन बियाणे तुटवडा होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासनाने मान्यता दिलेले बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे.” असे आवाहन यावेळी कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी केले. तर ‘खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एम एफ एस आधार प्रणाली द्वारेच खत विक्री करावी.” असे आवाहन कृषी अधिकारी विजय धात्रक यांनी केले. “चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू देणार नाही. ज्यादा दराने कुणी विकत असेल तर असोसिएशनमार्फत आम्ही त्यांना समज देऊ.” अशी ग्वाही चांदवड तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव यांनी दिली.

 

 

 

 

गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पं.स.चांदवड श्रीमती नलिनी खैरनार यांनी तपासणी आढावा व तालुक्यातील महत्त्वाच्या बाबींचा आढावा कृषी विकास अधिकारी कार्यालयाला सुपूर्द केला.

यावेळी नलिनी खैरनार, बापूसाहेब शिंदे, प्रवीण आवारे, कैलास सोनवणे,  आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या