अहिल्यादेवी होळकर याची जयंती चांदवड मध्ये रंगमहाल व रेणुका देवी मंदिरात साजरी
अति सुशिल वह कन्या थी,
अरू नाम अहिल्याबाई था,
मुखमंडल की ज्योति देखकर,
भास्कर भी शरमाता था..
चांदवड : अहिल्यादेवी या एक कर्मयोगिनी असून त्याचा इतिहास अतिशय कठोर समजला जातो इ.स. १७२५ ते १७९५ हा त्यांचा जीवनकाल त्यांचा आठ वर्षांच्या असतांना सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून त्याच्या खंडेराव यांच्या सोबत विवाह झाला.’होळकर हे मूळचे फलटण भागातील होळ या गावचे असेल तरी अहिल्याबाई या नगर-आष्टी भागात असणाऱ्या ‘चौंडी’ गावच्या. माणकोजी शिंदे या गाव पाटलाची ही मुलगी प्रवासकाळात पेशव्यांच्या नजरेला पडली. आणि जुळते गोत्र पाहून त्यांनी तिला मल्हाररावांची सून म्हणून निवडली आणि मल्हाररावांच्या मुलाशी खंडेराव होळकरांशी तिचा विवाह झाला.
चांदवड शहरामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा चांगलाच वारसा लाभलेला असून त्यांनी यांच्या कार्यकाळयामध्ये रंगमहाल, 16 बाराव, तलाव, रेणुका देवी मंदिर, असा एक नाअनेक कार्यांचा उद्दार केलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी आपला बराच काळ चांदवड येथे दिला असून यावेळी या ठिकाणी बांधलेल्या रंगमहाल मध्ये बरेच दिवस सर्व प्रशासकीय कार्यालय अस्तित्वात होती आज च्या अवस्थेमध्ये या रंगमहालाचे पुरातत्व विभागातर्फे नूतनीकरणाचे काम चालू असून ते देखील रेंगळेले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे असे स्थानिक नागरिकांची मागणी असून येथे जर या वास्तूचा उद्धार झाला तर अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देतील आणि याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
आपल्या पुण्यशील कामासाठी ,कार्यासाठी परिचित असलेल्या अश्या चारित्र्यवान व्यक्तींना पुण्यश्लोक म्हटले जाते.
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको जनार्दन: ।
पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको युधिष्ठिर: ॥
या श्लोका व्यतिरिक्त पुण्यश्लोक जर कोणी असेल तर माता अहिल्याबाईसाहेब ह्या होय.
पुढे भविष्यात ही कोणी पुण्यश्लोक म्हणून घेणारे असे कोणाचे कार्य दिसत नाही. अहिल्याबाईंनी सेवाभावी वृत्तीने लोकांसाठी ज्या ज्या सोयी केल्या ,त्या करताना त्यांचा दिर्घकाळ कसा उपयोग होईल याची काळजी घेतली. मग ते मंदिर असो,नदीवरील घाट असो वा बारव असो.सगळ्याच वास्तू अगदी भरभक्कम व रेखीव बांधल्या. चांदवड येथिल रंगमहालात ( होळकरवाडा ) देवी अहिल्याबाईंचा पुतळा आहे त्यावरील सुंदर काव्यपंक्ती लक्ष वेधुन घेतात. देवी अहिल्याबाईंनी सकल मानव समाजासाठी कार्य केले. त्यांनी आपल्या राज्याबाहेरील अनेकानेक मंदिरे व घाट यांचा जिर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ मंदिर व शिवलिंग त्यांनीच स्थापन केले. अनेक विद्वान पंडीतांना धर्मकार्यत नियुक्त केले. गोर-गरीब जनतेसाठी अन्नछत्र व जागोजागी विहीरी खोदल्या , त्या मराठा साम्राज्याच्या एक कर्तबगार महाराणी होत्या… पण तरीही साधेपणाने जीवन जगल्या , त्या अत्यंत साध्वी वृत्तीच्या होत्या,त्यांच्या पवित्र स्मृतिंना शत्-कोटी वंद करत आज चांदवड येथील रंग महाल व श्री रेणुका देवी मंदिर येथे पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी केली
यावेळी चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल डॉ.आत्माराम कुंभार्डे, सुभाष पवार,अशोक व्यवहारे, साहेबराव शिंदे, प्रशांत ठाकरे, किशोर क्षत्रिय, महेश खंदारे, मनोज बांगरे, रविंद्र खरोटे, संजय चौबे, विशाल ललवाणी, बाळा पाडवी,विसपुते आदी नागरीक उपस्थित होते.

