गुरुजी म्हणजे मायेचा पाझर
इयत्ता सातवीत असताना वसतीगृह सोडून गावी निघून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी पायपीट करून माझे गुरुजी माझ्या गावी मला घ्यायला आले आणि त्यांनी मला परत वसतीगृहात नेले. असे झाले नसते तर मी एम.बी.बी.एस.सारखे उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो. म्हणूनच गुरुजनांमध्ये आईसारखी माया असते असे प्रतिपादन चांदवड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर श्री. राजेंद्रजी मलोसे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदवड(दगडी शाळा) या शाळेच्या १७७ व्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. शाळेचे हे वातावरण मला माझ्या लहानपणच्या शाळेची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही असेही ते म्हणाले.
मी या शाळेत शिकले याचा मला अभिमान असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे असे ठाम मत शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा चांदवडच्या नायब तहसिलदार डॉ. श्रीमती मीनाक्षी गोसावी मॅडम यांनी व्यक्त केले. मी या शाळेत शिकले आणि माझी पुढची पिढी सुद्धा प्राथमिक शिक्षण या शाळेतच घेईल, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढते आहे ही बाब जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या चांगल्या कामाचीच पावती आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
चाकोरीबाहेर जाऊन काम केल्यास त्या कामाचा दर्जा वाढतो असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा राष्ट्रपती पारितोषिक विजेते, सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक काका व्यवहारे यांनी व्यक्त केले. चाकोरीबाहेर जाऊन काम करणाऱ्याला त्रास नक्कीच होतो परंतु त्याच्या कामाचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसून येतो असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. शाळेच्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला चांदवड तालुक्यातील विविध कवी यांनी हजेरी लावून आपल्या कविता गायन/ वाचन करून उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी, गावातील शिक्षणप्रेमी बंधू-भगिनी, शाळेचे माजी विद्यार्थी व पंचायत समितीचे माजी सभापती श्री. नितिनजी गांगुर्डे, श्री. गोखले, नगरपालिकेतील सर्व अधिकारी वर्ग, चांदवड बिटाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पाचोरकर मॅडम,राहुड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री येवला सर तसेच चांदवड केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री वाल्मीक सोनवणे सर, रेणुका माता पतसंस्थेचे चेअरमन श्री.बबनराव कुंभार्डे सर, शाळेचे माजी विद्यार्थी श्री गंगाधर जी सोनवणे साहेब श्री विजू शेठ क्षत्रिय श्री अशोक सांबर,श्री सचिन (गुड्डू) खैरनार, श्री संजय पाडवी, श्री संजय चोबे, श्री संजय क्षत्रिय शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती उषाताई संगपाळ मॅडम ,जोशी मॅडम, मंगरूळ शाळेतील शिक्षिका श्रीमती वाघ मॅडम, अंगणवाडी ताई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रुपेश पवार , मुख्याध्यापक श्री संदीप महाले, शाळेचे माजी शिक्षक श्री हांडगे सर व सर्व माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


