[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

धरणग्रस्त बेरोजगार युवकाचां प्रश्न शासन दरबारी मांडणार : अभिष्टचिंतन सोहळयात आ.हिरामण खोसकर यांची ग्वाही

आहुर्ली व परिसरातील सुपरिचित वैतरणा धरण मुंबई शहराची तर मुकणे धरण नाशिक कराचीं तहान भागवते आहे. मात्र या परिसरातील तरुणांना मुंबई महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका यात कुठेही आरक्षित जागा नाही.

धरणग्रस्त बेरोजगार युवकाचां प्रश्न शासन दरबारी मांडणार : अभिष्टचिंतन सोहळयात आ.हिरामण खोसकर यांची ग्वाही

ईगतपुरी-(नवनाथ गायकर)
ईगतपुरी तालुका हा धरणग्रस्त, विस्थापित व बेरोजगाराचां तालुका असुन इथे उभ्या महाराष्ट्राला पाणी पाजण्याची क्षमता असतानाही हा तालुका मात्र ज्वलंत समस्यानीं वेढलेला आहे, असे सांगत हया प्रश्नावर आपण मुख्यमंत्री व मंत्री महोदयाचीं भेट घेणार असुन बेरोजगाराचां प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.
आहुर्ली येथे आ.खोसकर यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळयाप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

ईगतपुरी तालुक्यात एकुण छोटी मोठी १३ धरणे असुन हा तालुका निम्म्या महाराष्ट्राची तहान भागवतो. या शिवाय औद्योगिक वसाहत, रेल्वे, लष्कर, राष्ट्रीय महामार्ग आदीसह विविध प्रकल्प या तालुक्यात असुन अजुनही काहि नव्याने प्रस्तावित आहेत.

आहुर्ली व परिसरातील सुपरिचित वैतरणा धरण मुंबई शहराची तर मुकणे धरण नाशिक कराचीं तहान भागवते आहे. मात्र या परिसरातील तरुणांना मुंबई महानगरपालिका व नाशिक महानगरपालिका यात कुठेही आरक्षित जागा नाही. या हक्काच्या आरक्षित जागा मिळुन स्थानिक धरणग्रस्त युवकांना रोजगार मिळावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन कश्यपी-गौतमीच्या धर्तीवर नौकर्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी दिली आहे.
याबाबत लवकरच मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचेसह सबंधित मंत्री महोदय यांच्या भेटी गाठी घेऊन हा प्रश्न धसास लावु असेही खोसकर यावेळी म्हणाले.

शरद पवाराचां ईगतपुरी तालुका दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांचेसह उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांचा ईगतपुरी तालुक्यात दि.७ जुन ला नियोजित दौरा होता. मात्र सदर दौरा पुढे ढकलण्यात आला असुन लवकरच खा.शरद पवार हे या तालुक्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती ही आ.खोसकर यांनी यावेळी दिली.

आहुर्लीसह परिसरातील तब्बल वीस बावीस गावातील शासन संपादित मात्र वापराअभावी पडून असलेल्या व मुळ मालक वा त्यांच्या वारसदार यांच्या सदयस्थितीत ताबा असलेल्या अँक्वाँर जमिनी सोडवण्यासाठी ही आपले जोरदार प्रयत्न सुरू असून लवकरच या जमिनी ही आपण मुळ मालकानां मिळवून देऊ असा दावाही आ.खोसकर यांनी यावेळी केला.

या प्रसंगी माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, जेष्ठ शेतकरी नेते पांडु मामा शिंदे हे ही उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी कर्होळे चे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग खातळे, युवा नेते प्रतिक गोवर्धने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रविण खातळे, काँग्रेसचे लकी गोवर्धने, म्हसुर्लीचे सरपंच जगन्नाथ पोटकुले, शेवगेडांग चे सरपंच साहेबराव खंडवी, सांजेगाव चे सरपंच शंकर गोवर्धने, शिवसेनेचे कुंडलिक जमधडे, रामदास जमधडे, तुकाराम गायकर, भाऊसाहेब गायकर, तुकाराम गायकर, महाधु गायकर, बबन गायकर, रामदास गायकर, शरद खकाळे, अशोक महाले, रावसाहेब खातळे, काळु जाधव, योगेश काळे, मधुकर गायकर, दत्तु गायकर आदीसह असंख्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खातळे यांनी केले.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या