[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी वडनेरमध्ये भालेराव परिवाराची घेतली सांत्वनपर भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी वडनेरमध्ये भालेराव परिवाराची घेतली सांत्वनपर भेट

चांदवड — कोरोना च्या काळात रुग्णांची जनसेवा करणारे आणि त्याच सेवेतून देशभर प्रसिद्धीस आलेले आमदार निलेश लंके त्याबरोबर विधान सभा अध्यक्ष माननीय श्री.नरहरी झिरवाळ साहेब यांनी बुधवारी 1 जूनला चांदवडचे माजी आमदार उत्तमबाबा भालेराव ,माजी चेअरमन दौलतराव नाना भालेराव यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली.

आमदार निलेश लंके नामदार झिरवाळ यांनी कै पूजा चेतन भालेराव यांच्या निधना बाबत माहिती जाणून घेतली त्यांना धीर दिला .तर श्री चेतन रामराव भालेराव यांच्याशी वैयक्तिकरीत्या झिरवाळ साहेब आणि लंके साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना नियतीच्या बाबतीत व अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करून अशाही परिस्थितीत स्वतःला सावरणे याबाबत मानसिक आधार देण्याचे काम केले.

यावेळी श्री.रामभाऊ भालेराव, रावसाहेब भालेराव ,बापू भालेराव, काका भालेराव , अमोलभाऊ भालेराव ,तात्या भालेराव ,सुदर्शन व संकेत उपस्थित होते. डॉक्टर विक्रम सलादे यांना आमदार लंके यांनी संपर्क करून या दुःखद सांत्वन भेटीबाबत कल्पना दिल्यानंतर डॉक्टर विक्रम सलादे यांनी नियोजन केले .यावेळी बोपेगाव सरपंच वसंत कावळे श्री उगले आणि उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या