अबब… 8 फुटाचे नारळ भगवंताच्या चरणी
विश्वविक्रमाने रचला इतिहास
: गिनीज वर्ड रिकार्डस मध्ये नोंद असलेली एकाच दगडात कोरलेली जगातील सर्वात उंच (108 फुट) भगवान ऋषभदेवाच्या प्रतिमेच्या चरणी भाविक रोज श्रीफळ (नारळ) चढवितात. ऐवढी मोठी प्रतिमा आपल्या जिल्ह्यात आहे, आपणही काही मोठ्ठे बनवुन भगवंताच्या चरणी अर्पण करावे हीच इच्छा चांदवडचे पूर्व नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे दोन्ही मुले कु. आरुष व कु. कविश बाळगुन होते… 
अचानक मांगीतुंगी येथे ऋषभदेवाच्या 6 वर्षीय महामस्तकाभिषेकाची घोषणा झाली त्यानिमित्ताने ज्यांनी आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरुप देण्याची योजना आखली.
आज भगवान ऋषभदेवाच्या चरणी चक्क 8 फुट उंच श्रीफळ चढविण्यात आले. गणिनी आर्यिका ज्ञानमती मातांजीनी हस्तिनापुर येथुन आँनलाईन उपस्थित राहुन या श्रीफळाची प्रशंसा केली व आरुष, कविश यांना विशेष आर्शिवाद दिले.. आँनलाईन बोलतांना त्यांनी सांगितले कि भूषण कासलीवाल यांचे पिताश्री स्व. आमदार जयचंद कासलीवाल यांनी त्याकाळी या मुर्तीच्या निर्माणासाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरु शकत नाही. सध्या भूषण कासलीवाल यांनी ही मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खुप मेहनत घेतली. आता त्यांची तिसरी पिढी या क्षेत्रासाठी योगदान देत आहे.. एवढया लहान वयात मुंलावर उच्च प्रतिचे धार्मिक संस्कार केल्यामुळे आई रिंकु कासलीवाल व भूषण कासलीवाल यांचे मातांजीनी विशेष कौतुक केले.
या श्रीफळाच्या निर्मितीसाठी लागणारा सर्व खर्च आरुष व कविश यांनी खाऊच्या पैश्यातुन ( गुल्लक मध्ये) केला आहे. 1008 नारळ वापरुन या श्रीफळाची निर्मीती करण्यात आली आहे. वीर सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी या श्रीफळाच्या निर्मीतीसाठी शाऱिरिक श्रमदान केले.
याविषयी बोलतांना आयुष याने सांगितले कि, जमिनीपासुन 2500 फुट उंच पहाडावर 1008 नारळ, फेब्रिकेशन मटेरियल, व अनेक वस्तु वर नेणे हे अवघड कार्य होते. यासाठी लागणारा स्टँन्ड वर नेण्यासाठी विशेष क्रेन लावावी लागली. त्यासाठी श्री 108 मुर्ति निर्माण समिती, ऋषभगिरीचे विशेष सहकार्य लाभले. प.पू. रविंद्रकिर्तीजी स्वामीजी यांनी खूप मार्गदर्शन केले. या भव्य मुर्तीच्या चरणी भव्य श्रीफळ चढवुन आपणही पुण्यलाभ घ्यावी ही माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली याचे मला समाधान आहे. मला यासाठी आई, वडिल, आजी अर्चना कासलीवाल यांनी प्रेरणा दिली आहे.
अभिषेकानंतर १००८ नारळांचा वापर करून तयार करण्यात आलेले भव्य व आकर्षक श्रीफळ भगवान ऋषभदेवांना अर्पण करण्यात आले. भारतात प्रथमच एवढी मोठी प्रतिकृती तैय्यार करण्यात आली आहे. त्याची नोंद अमेझिंग वर्ल्ड रिकार्डस मध्ये करण्यात येणार आहे. त्याच्या परिक्षणासाठी अमेझिंग वल्ड रिकार्डस ची टीम 2 दिवसांनी मांगीतुंगी येथे येणार आहे.
बाँक्स – 250 किलो लोखंड, 1008 नारळ, 10 किलो सुतळी, 100 मीटर लेस वापरुन केले तैय्यार
भारतात पहिल्यांदाच एवढे मोठे नारळ
अमेंझिंग वर्ल्ड रिकार्ड मध्ये होणार नोंद
खाऊच्या पैश्यातुन उचलला खर्च

