[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे योगदिन संपन्न

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

जि.प.शाळा आडगाव येथे योगदिवसाचे आयोजन

आडगाव रेपाळ (वार्ताहर ) : जिप.
शाळा आडगाव रेपाळ येथे जागतिक योगदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण व मार्गदर्शन व संचलन जि.प.शिक्षक सुरज झाल्टे यांनी केले.विद्यार्थ्यांनी उत्साहात या प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांकडून सोप्या आसनांचे प्रकार करुन घेण्यात आले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपसरपंच रामकृष्ण यादवराव निकम,उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बागुल उपस्थित होते,त्यांनी योग प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवून शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स युनिफॉर्म घेण्याची सुचना मांडली.सुर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक कसे असावे याचे मार्गदर्शन व क्रुती सुजाण पालक संतोषकुमार निकम यांनी करुन दाखवली.योग व व्यायामाची आवश्यकता व गरज याबाबत माहिती देण्यात आली.प्रसंगी मुख्याध्यापक रमेश उगले,शिवाजी आहेर,सुरज झाल्टे,विकास कदम,संदिप चव्हाण,राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या