[masterslider id="2"]
राज्य स्थानिक बातम्या

चांदवड येथे बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना चांदवड तालुक्याच्या वतीने मोर्चा 

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड येथे बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना चांदवड तालुक्याच्या वतीने मोर्चा 

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना चांदवड तालुक्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला .शिवसैनिक हा सदैव उद्धव साहेब ठाकरे व शिवसेनेबरोबर आहे.तसेच मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ चांदवड शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, व बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ निषेध व्यक्त केला व चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने बंडखोर आमदारांना आव्हान केले की राज्याच्या व जिल्हाच्या विकासासाठी तुम्ही परत या अशी असंख्य शिवसैनिकांनी मागणी केली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल भाऊ पाटील,मा.जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबडे, उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर ,शिवसेना तालुकाप्रमुख विलासनाना भवर, महिला आघाडी उपजिल्हासंघटक अर्चनाताई पूरकर, जिल्हापरिषद सदस्या कविताताई धाकराव,तालुका संघटक केशव ठाकरे,शहरप्रमुख संदीप उगले, तालुका समन्वयक सोमनाथ पगार, चंद्रकांत देवरे,रोहित ठाकरे, सुरेखा पगार व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी उपतालुका प्रमुख गटप्रमुख गणप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या