[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेत योग प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेत योग प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

चांदवड :-आजादी का अमृतमहोत्सव व आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी दि.२१ ते २५ जून २०२२ रोजी मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणामध्ये योग अध्यापक राहुल (अंबादास) भिला येवला योग प्रशिक्षक व निसर्गोपचार मार्गदर्शक तसेच केंद्रप्रमुख योग विद्या धाम, चांदवड व अध्यक्ष योगदर्शन फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढीसाठी तसेच आरोग्य प्राप्ती, रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. व सर्व विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी मुख्याध्यापक संदीप ललवाणी यांनी केले तर किरण कुवर सरांनी राहुल येवला सर यांचा परिचय करून दिला. आणि राधेश्याम चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सीमा अहिरे, पूनम जाधव, योगेश फुलदेवरे, सारिका पगार,अनिल मांडोडे, संतोष मढ़े, मृणाल जाधव, राहुल ठाकरे, अनघा धरमकेले, पारस बरडिया, इंदर बाफना संजय हिरे, आदी शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड़, विश्वस्त नंदकिशोर ब्रम्हेचा प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, सह मानद सचिव व शाळेचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, संस्थेचे सर्व विश्वस्त सदस्य व पदाधिकारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या