[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सलादे बाबा कला व क्रीडा मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे गुरुपौर्णिमा साजरी

सलादे बाबा कला व क्रीडा मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे गुरुपौर्णिमा साजरी

वडनेर भैरव येथील आध्यात्मिक गुरु नाथ उपदेशी सलादे बाबा यांनी सुरू केलेला गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी 53 व्या वर्षात पदार्पण करीत आहे .दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्ताने सलादे बाबा यांनी वडनेर भैरव च्या कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता मंदिरात सुरू केलेली पूजा, अभिषेक ,आरती व रोट प्रसाद त्यांच्या पश्चातही सलादे परिवार आणि सलादे बाबा कला क्रीडा मंडळ वडनेर भैरव च्या वतीने सर्व परंपरेचे आयोजन करण्यात आले. आज वडनेर भैरव च्या कालभैरवनाथ मंदिरात सकाळी सात वाजता सलादे बाबा यांचे नातू श्री मनीष सुरेश सलादे व सौ निकिता मनीष सलादे या उभयतांच्या हस्ते भैरवनाथ महाराज यांना अभिषेक महाआरती करण्यात आली . यावेळी प्रगतशील शेतकरी किरण आवारे, सुभाष काका सलादे, राजेंद्र आहेर, राजेंद्र यशी ,मंगेश शिवाजी वक्ते ,सरपंच सुनील पाचोरकर, दत्ता शिंदे, भाऊ भंडारे आदी उपस्थित होते. सलादेबाबा दत्त मंदिर येथे सलादे बाबा व दत्त महाराज यांच्या मूर्तींना शिरवाडे वणी येथील दत्तात्रय आंबेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. यावेळी मनोहर नाना पाटोळे, दत्तात्रय निखाडे ,राहुल पाचोरकर, दीपक पाचोरकर, बबन वक्ते, योगेश साळुंखे ,नाना सलादे ,सुरेश पवार आदी उपस्थित होते. आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत मनीष सलादे यांनी केले. तर आभार अजिंक्य सलादे यांनी मानले.

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या