नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे फोटो शासकीय व निमशासकीय कार्यालयात लावणे बाबतचे भाजपा चांदवड ने दिले निवेदन
चांदवड : चांदवड – देवळा विधानसभा या मतदारसंघांचे प्रशासकीय उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना आज चांदवड भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले यात मतदार संघात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालय आहेत.
यात बऱ्याच ठिकाणी देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे फोटो लावलेले नसून आता नवनियुक्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे या बाबतचे निवेदन दिले. जेणेकरून ही अतिशय महत्त्वाची व देशाची प्रमुख पदे असल्याने इतर सर्व कार्यालयात पत्र देऊन प्रत्येक कार्यालयात फोटो लावण्यास यावे अशी विनंती भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली.
सदर निवेदन हे भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांच्या वतीने देण्यात आले यावेळी भाजपा चांदवड तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,प्रशांत ठाकरे,विशाल ललवाणी,संजय पाडवी,संजय क्षत्रिय, किशोर क्षेत्रीय, सचिन राऊत, महेंद्र कर्डिले,महेश खंदारे,राहुल निरभवणे,सागर बडोदे,विकी काळे,इतर नागरीक उपस्थित होते.

