स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करणे संदर्भात केंद्र व राज्यशासनाचे निर्देशानुसार चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थित हर घर तिरंगा मोहिमेबाबत तालुक्यातील सर्व विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी ,तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच,ग्रामस्तरीय कर्मचारी तलाठी ,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ,पोलीस पाटील तसेच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात येऊन नागरिकांना दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांचे घरावर ध्वज उभारता यावा यासाठी ध्वज उपलब्ध करून देण्याबाबत गाव निहाय नियोजन करण्यात आले .
तसेच ध्वज उभारताना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन ध्वज उभारल्यानंतर कुटुंबासोबत “सेल्फी विथ तिरंगा “काढून गावाच्या व तालुक्याच्या सोशल मीडियावर ग्रुप वर प्रसिद्ध करण्याबाबत आवाहन करण्यात आले याशिवाय दिनांक 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान गावनिहाय प्रभात फेरी , विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार व सन्मान, स्वातंत्र्य सैनिकांचे व ज्येष्ठांचे मार्गदर्शन,महिला मेळावे, महिला बचत गटांना आर्थिक शिस्तीबाबत मार्गदर्शन, किशोरी मेळावे , बालगोपाल पंगत , स्वच्छता अभियान , पर्यावरण संवर्धन अभियान, हेरिटेज वॉक, मोबाईल वापराचे आरोग्यावरील दुष्परिणाम , ऑनलाइन व सायबर गुन्हे याबाबत कार्यशाळा,सेंद्रिय शेती व शेती कार्यशाळा, शेतकरी मेळावे, देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम , लोककलावंत यांच्यामार्फत स्वातंत्र्याचा इतिहास ,माझा गाव माझा इतिहास असे अनेकविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिक विद्यार्थी यांचा सहभाग मिळवण्यासाठी तालुकास्तरावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचारी यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन माननीय आमदार श्री राहुल आहेर यांनी उपस्थितांना केले तसेच प्रतिनिधीक स्वरूपात सरपंच यांना तिरंग्याचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी चांदवड उपविभागीय अधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख , तहसीलदार प्रदीप पाटील ,गट विकास अधिकारी महेश पाटील , पोलीस निरीक्षक चांदवड समीर बारवकर साहेब ,पोलीस निरीक्षक श्री तायडे वडनेर भैरव , तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज ठाकरे , गटशिक्षणाधिकारी शिंदे एस एस, असे तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच ग्राम पातळीवरील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक ,ग्रामसेवक पोलीस पाटील , मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तसेच सर्व सरपंच उपस्थित होते.

