[masterslider id="2"]
राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील उत्कृष्ट घरकुल व उत्कृष्ट ग्रामपंचायत पारितोषिके : मेसनखेडे खु. ग्रामपंचायत ठरली प्रधानमंत्री आवास योजनेसाठी उत्कृष्ट ग्रामपंचायत तर उत्कृष्ट घरकुलाचे वाद या गावाच्या लाभार्थ्याला पारितोषिक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २०२१ ते ३० जुन २०२२ या कालावधीत महा आवास अभियान – ग्रामीण २.० राबविण्यात आलेले होते त्या अंतर्गत तालुक्यातील उत्कृष्ट घरकुल , उत्कृष्ट ग्रामपंचायत यांच्यासाठी पारितोषिके हि ठेवण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज दि. ०८/०८/२०२२ रोजी चांदवड तालुक्यातील पारितोषिक वितरण सोहळा पंचायत समिती चांदवड सभागृहात मा. आमदार ड्रॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्यात तालुक्यातील उत्कृष्ट घरकुल व उत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट क्लस्टर यांना पारितोषिके देण्यात आली

प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात उत्कृष्ट ग्रामपंचायत ठरलेल्या मेसनखेडे खुर्द या गावाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चांदवड देवळा मतदार संघाचे आ. राहुलदादा आहेर यांच्या हस्ते स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी शशिकांत अहिरे. समवेत गटविकास अधिकारी महेश पाटील मनोज शिंदे ,गीताताई झाल्टे, अंबादास ठोंबरे व आदी.

उत्कृष्ट घरकुल :- प्रधानमंत्री आवास योजना :-
1) कचरू गणपत पवार – वाद
२) कुसुमबाई किसन चौधरी – कानडगाव
३) आण्णा शंकर कडाळे- खडकओझर

उत्कृष्ट घरकुल :- राज्य पुरस्कृत विविध आवास योजना:-
१) माणिक गोपाळा आहिरे – उसवाड
२) यशोदाबाई लुखा निरसट- दह्याणे
३) लक्ष्मन रमेश अहिरे- सोग्रस

उत्कृष्ट ग्रामपंचायत :- प्रधानमंत्री आवास योजना :-
१) मेसनखेडे खु.
२) भायाळे
३) रायपुर

उत्कृष्ट ग्रामपंचायत राज्य पुरस्कृत विविध आवास योजना:-
१) मंगरूळ
२) दह्याणे
३) कोकणखेडे
उत्कृष्ट ग्रामपंचायत क्लस्टर प्रधानमंत्री आवास योजना:-
१) दुगाव :- शेवाळे किरण नाना ( स्थापत्य अभियंता )

उत्कृष्ट ग्रामपंचायत क्लस्टर राज्य पुरस्कृत विविध आवास योजना:-
१) वडाळीभोई :- अरुण भामरे ( स्थापत्य अभियंता )

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या