[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेर भैरव गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगाचे वितरण

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

 

वडनेर भैरव (प्रतिनिधी ) देशभक्ती देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविण्यात उपक्रम हे महत्त्वाचे असून येत्या 13 ऑगस्ट चे 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या अभियानासाठी शासकीय यंत्रणांना सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने वडनेर भैरव सु परिसरात जनजागृतीचे काम केले जाईल अशी माहिती सलादे बाबा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक श्री सुरेश सलादे वडनेर भैरव पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामस्थांना वितरित करण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वज तिरंगा वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले वडनेर भैरव पोस्ट ऑफिस च्या वतीने वडनेर भैरव परिसरात केंद्र सरकारच्या अमृत महोत्सवी भारत देश स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत वडनेर भैरव येथील अनेक नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज चे वितरण करण्यात आले. यावेळी वडनेर भैरव येथील किराणा व्यापारी श्री सुरेश मुरलीधर व्यवहारे यांना सर्वप्रथम सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज सलादे बाबा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक व विकी कावळे विद्यालय कादवा कारखाना शिक्षक श्री सुरेश सलादे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी सलादे बाबा ट्रस्टच्या वतीने 100 राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आले आहे यावेळी वडनेर भैरव गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी श्री सलादे यांनी बोलताना केले वडनेर भैरव चे पोस्ट मास्तर श्री एस एम गांगुर्डे श्री कुणाल पवार श्री आर आर चौरे श्री प्रकाश जोशी आदी यावेळी उपस्थित होते वडनेर भैरव मध्ये भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सलादे बाबा कला क्रीडा मंडळ च्या वतीने रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असून यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत अशी पण माहिती श्री सलादे यांनी दिली

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या