०९ आॉगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह ,चांदवड येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने भगवान एकलव्य व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन करत आदिवासी दिन साजरा केला.
यावेळी अश्विनी हिंगले व ज्योती बागुल या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. आदिवासी गौरव दिन का साजरा करायचा या विषयावर निलेश गुलाब चौरे या विद्यार्थ्याने भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भुषण कासलीवाल यांनी भुषविले व भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या वसतीगृहाचे अधिक्षक हितेंद्र राठोड यांनी देशभक्ती पर गीत सादर केले. मुलींच्या वसतीगृहाच्या अधिक्षिका स्वप्नाली पाटील यांनीही शिक्षण व वसतिगृहातील सेवा या बद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भुषण कासलीवाल ,संजय पाडवी , प्रशांत ठाकरे , मच्छिंद्र गांगुर्डे , मुन्ना मोरे , महेश खंदारे , मुकेश आहेर , विशाल ललवाणी , संकेत वानखेडे ,यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रम आनंदात पार पडला तसेच इतरही आदी पदाधिकारी नागरीक उपस्थित होते.
विद्यार्थी निलेश चौरे व अश्विनी हिंगले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन मानले.

