[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडगाव पंगु येथे जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगुत व परिसात गेल्या 15 दिवसापासून हलका पडणारा पाऊस आज अतिशय जोरदारपणे पडला .इतका भयावह पाऊस 3 वर्षात पहिल्यांदा पडला असावा असा अंदाज व्यक्त केलाजात आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

गावच्या पुलावरून 6 फूट उंच पाणी हनुमान वाडी आणि भडाने परिसर जलमय झाला आहे. कांडेकर वस्ती येथे शेतमाल पूर्ण पाण्यात गेल्यानं तुडुंब पाण्यानें पिक सडली, ईनाम ,वाजे वस्ती, कचरू गोजरे, प्रकाश सोनवणे, सुकदेव फिटर, रघु गोजरें , यांचे 80 % पिक पाण्यात कुजली पिवळे झाले, मयाराम भाऊ , विलास संसारे यांचे शेतात पाणी गेले , सूर्यकांत भाऊ , कारभारी पवार, रामदास झाल्टे, हरी शिवराम गोजरे. पोपट नाना , प्रदीप गोजरे, धर्मा नाना , गिरणारकर , श्रीकांत झाल्टे , रवींद्र चव्हाण , हरिभाऊ जाधव, संजय चव्हाण , उत्तम जाधव , मच्छिंद्र माकोने , भीमा जाधव , दिलीप गोजरे , अरुण गोजरे , संजय गोजरे , प्रल्हाद लहरे, अशोक सातभाई, श्रीहरी कांडेकर, दादा गोजरे, विनायक चव्हाण, विठ्ठल चव्हाण, पाराजी चव्हाण , बाप्पु चव्हाण , विनायक गोजरे, नाना गोजरे, राजेंद्र गोजरे, अशा शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. सर्वांनी तालुका लोक , प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ताई पवार ,या तालुक्याचे आमदार राहुल दादा आहेर,आणि डॉ  कुंभार्डे आणि तहसिलदार पाटील साहेब कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी साहेब यांना सर्वांना व्हिडिओ आणि प्राथमिक माहिती दिली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे .

रेल्वेपुलाखाली तुंबलेले पावसाचे पाणी

 

या भागाचे मागच्या वर्षी अतोनात नुकसान झाले पण पर्जन्य मापक आकडेवारी चुकीची गेल्याने शेजारी कातरणी च्या लोकांना उपळाट आणि विमा 100% मिळाला आमच्या भागाला 20 % विमा मिळाला पण वागदर्डी, रायपुर, भडाने या गावातील काही शेतकऱ्यानं विमा मिळाला नाही तरी पूर्व भागाची विनंती असणार आहे या वर्षी मका पिकाला बिट्या आल्या नाही मुगाला शेंगा नाही सोयाबीन पिकाला फुल नाही रोप ३ वेळा टाकून फेल गेलं जनावरं यांना चारा नाही आणि लहान पिक तर पिवळी झाली काही शेतात तुडुंब पाणी भरले आहे. शेजारचा शेतकरी बांध फोडून पाणी काढू देत नाही यामुळे पिक सडली आहे म्हणून टोमॅटो पिक हाती लागेल ही अशा होती पण थोड सुधा उन पडत नसल्याने करपा आला आहे आमची पूर्व भागातील लोकांची प्रशासनास आणि लोक प्रतिनिधी यांना विनंती आहे की ही बाब शासन दरबारी मांडावी आणि अन्नदाता खचनार नाही या साठी त्याला मदतीचा हात द्यावा तरच तो सक्षमपणे उभा राहू शकेल. आमची चांदवड आणि मनमाड येथील पत्रकारांना विनंती असणार आहे की कधी शेतकरी वर्गाची बाजू आपण खंबीर पने लेखणीतून प्रभावी पने मांडावी जेणे करून शेतकरी वर्गाला आधार मिळेल या बाबत प्रत्येक गावात नागरिक यांनी आपल्या शेती पिकाचे पाणी साचलेले फोटो तालुका प्रशासनाला पाठवावे किंव्हा गत वर्षी मुख्यमंत्री यांना मंत्रालय मेल वर हजारो मेल आपण पाठवले होते पण निर्णय झाला नाही .आमच्या भागाचा आत्ता आपण सरकारकडे आपल्या हक्काचा विमा मागणार आहोत जो बीड पॅटर्न आहे तो तात्काळ लागू करा आणि उपळाट साठी काय निकष आहे त्या बाबत कार्यवाही करावी ही पूर्व भागाची प्रभावी मागणी असणार आहे आणि गेट नंबर१११ अंडर बायपास. किंव्हा ब्रीज यासाठी आम्ही ३ वर्षापासून पाठपुरावा करतो आहे यावेळेस कातरवाडी आणि आम्ही लवकरच केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे साहेब आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती ताई पवार यांची वडगाव पंगू शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहे .याबाबत लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या